प्रा. ॲड. आकाश हराळ इंग्रजी विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण…

अकोला (दि १४ नोव्हेंबर,२०२२)-

परिस्थिती यशाच्या आड कघीचं येत नाही हे वारंवार आपल्या कर्तुत्वातुन आकाश हराळ यांनी सिध्द केले. अशोक नगर, अकोट फाईल या भागात राहुन परिस्थितीशी दोन हात करुन जीवन जगत असलेला हा मुलगा श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथुन सं गा बा अम विद्यापीठातुन एम ए च्या परीक्षेत इंग्रजी विषयात मेरीट येतो गोल्ड मेडल मिळवतो. याचे श्रेय तो प्रोफेसर डॅा एम आर इंगळे आणि प्राचार्य डॅा सुभाष भडांगे यांनी यु जी सी नवी दिल्ली च्या नुसार सुरुवात केलेल्या डॅा बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राला देतो.

या अभ्यास केंद्राच्या माध्यमातुन अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवत आहेत हे विशेष

एम ए झाल्यानंतर लगेचं तो घड्याळी तासिका तत्वावर श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे अध्यापनाचे कार्य सुरु करतो आणि दुसऱ्याचं वर्षी प्राध्यापक पदाची राज्यस्तरीय सेट परीक्षा इंग्रजी विषयात उत्तीर्ण करतो.

सोबतचं कायद्याचे शिक्षण देखील सुरु असते. ह्युमन राईट्स या विषयात एल एल एम ची परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण करतो. आता पि. एच.डी. च्या कार्यास सुरुवात केली आहे.

एवढे असुनही स्वस्थ बसला नाही तर राष्ट्रीय स्तरावरील जून-२०२२ ची नेट परीक्षा इंग्रजी विषयात ९१% मार्क घेवुन उत्तीर्ण करतो. व्यक्तीने ठरवलं तर काय नाही करु शकत याचं मुर्तीमंत उदाहरण आकाश हराळ आहे.

विद्यार्थ्यांना आदर्श असावा असं व्यक्तीमत्व आकाश हराळ आहे. तो उत्तम कवी, अभिनेता आणि साहित्यीक आहे. समाजकार्यात नेहमी अग्रेसर असतो अशा या प्रतिभावान व्यक्तीस त्याच्या या यशाबद्दल सर्वचं स्तरातुन त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आपल्या यशाचे श्रेय तो आई वडील आणि मोठ्या भावाला देतो. त्याच्या या यशाबद्दल
प्रोफेसर डॅा एम आर इंगळे, डॅा मनोहर वासनिक, प्रा राहुल माहुरे, प्रा प्रकाश गवई, विशाल नंदागवळी, अमीत लोंढे, विक्की मोटे, राहुल कुरे, आदित्य बावनगडे, रोहीत पाटील, आकाश जाधव, विशाल इंगळे, रोहन काळे, सागर तेलगोटे, आनंद धानोरकर, भरत चांदवडकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.