Table of Contents
संविधान रथ,शेतकरी देखावा,वारकरी दिंडी,महिला भजनी मंडळ,पथनाट्य समावेश

स्थानिक/अकोला दि २६ डिसेंबर २०२४
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला, श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय व श्री शिवाजी ह्यास्कूल अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची १२६ जयंती निमित्त भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रभात फेरीच्या उद्घाटन प्रसंगी आमदार साजीद खान पठान, डॉ सुभाषचंद्र कोपरे, मा.सुरेशराव राऊत, मा.शिरिषभाऊ धोत्रे, मा.महादेवरावजी भईभार, प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे, श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत थोरात, श्री शिवाजी हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री विजय ढोकळ, मा.अशोकराव देशमुख, मा.पी.एस वाटाने, मा.उपाध्ये, मा.केशवराव खांडेकर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हारर्पण करून अभिवादन करण्यात आले. व हिरवी झेंडी दाखवून प्रभात फेरीचे उद्घाटन करण्यात आले.महाविद्यालय अकोट स्टँड,अग्रसेन चौक, रेल्वे स्टेशन मार्गे महाविद्यालय असे मार्गभ्रमण करण्यात आले, या प्रभात फेरी दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना द्वारे संविधानाचे अमृत महोत्सव म्हणून संविधान पुस्तक व प्रास्ताविकाचा देखावा करण्यात आले व राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने डॉ पंजाबराव देशमुख यांचे कृषी विषयक कार्य यावेळी प्रतिकृतीद्वारे सादर करून पथनाट्य सादर केले. पथनाट्याचे विशेष आकर्षण मुलिंची पहिली शाळा व भाऊसाहेब देशमुख यांचे पापड गाव दाखविण्यात आले. संत गजानन महाराज मंदिर देशमुख पेठ येथील २० वारकरी टाळ, मृदंगाच्या गजरामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली.

प्रभात फेरीचे समारोप श्री शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये राष्ट्रगीताने करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाला महाविद्यालयातील विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ नितीन मोहोड गृहविज्ञान विभागाचे समन्वयक डॉ.अंजली कावरे वाणिज्य विभागाचे समन्वयक डॉ. संजय तिडके मानवविद्या शाखेचे समन्वयक डॉ. नाना वानखडे आय.क्यू.ए.सी समन्वयक डॉ.आशिष राऊत राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख डॉ. आनंदा काळे सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ. हर्षवर्धन मानकर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.सचिन भुतेकर महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. मयुरी गुडघे सह कार्यक्रमाधिकारी प्रा. शुभम राठोड महिला सहकार्यक्रम अधिकारी प्रा. रसिका पाटील प्रा. प्राजक्ता पोहरे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे ब्रँड अँबेसिडर रोहन बुंदेले उपस्थित होते. महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते.
