
सदर गुन्हयाची हकिकत अश्या प्रकारे आहे कि, दि. २२/०२/२०२५ रोजी फिर्यादी प्रबजीतसिंग जगजीतसिंग सहानी वय ४३ वर्ष व्यवसाय: टान्सपोर्ट रा. दत्त मंदिरासमोर रामदास पेठ, अकोला यानी पोलिस स्टेशनला येवुन रिपोर्ट दिला कि, दि. २२/०२/२०२५ रोजी त्याचा टूक क MH30 A.V.0646 हा चालक नामे शेख रियाज शेख वाहीद हयाने नेहमी प्रमाणे संध्याकाळी ०७/०० वा सुमारास मालथक्का रेल्वे स्टेशन चौक, अकोला येथे उभा करून घरी गेला होता दि. २३/०२/२०२४ रोजी चे रात्री ०१/५० वा दरम्यान माझा उभा असलेला ट्रक हा काणीतरी उश्ररत आरोपी हयाने चोरून नेला आहे असे मला दि. २४/०२/२०२४ रोजी माझा ट्रक चाकल शेख रियाज शेख वाहीद सागीतले आहे. तरी माझा १४ चाकी ट्रक क MH30 A.V.0646 कि.अ. ८,००,००० रु चा हा दि. २२/०२/२०२४ चे संध्याकाळी ०७/०० ते दि. २३/०२/२०२४ चे ०१/५० वा दरम्यान अज्ञात चोराने चोरी केला आहे. अशा फिर्यादीचे जबानी रीपोर्ट वरून पोस्टे रामदासपेठ, अकोला येथे अप.न.७९/२५ केलम ३०३(२) BNS चा करून सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला.
सदर गुन्हयातील चोरी गेलेला टूक क MH30 A.V.0646 हा उत्तर प्रदेश येथे चोरी करून नेल्या बाबत गोपनीय माहीती मिळाल्याने आरोपीचा शोध घेणे कामी पोलीस स्टेशन रामदासपेठ, अकोला यांनी एक तपास पथक पोहवा शेख हसन शेख अब्दुल्ला, पोकॉ. श्याम मोहळे यांना उत्तर प्रदेश येथे तपास कामी खाना केले.
उत्तर प्रदेश पोलीसांची मदत घेवुन सदर गुन्हयातील चोरी गेलेला ट्रक क MH30 A.V.0646 चा शोथ घेवुन ताब्यात घेतले. तसेच सदरचा गुन्हा करणारा आरोपी नामे नरसिंह रामस्वरूपसिंह गुजर वय ४१ वर्ष, रा. ११५ मॅकनीक्ल नगर, खतीकवाला टॅकं इन्दोर मध्ये प्रदेश यांचा गोपनीय बातमीदारा मार्फत शोध घेवनु त्यास सदर गुन्हयात ताब्यात घेवुन कार्यवाही करून सदर गुन्हयातील चोरी गेलेला ट्रक क MH30 A.V.0646 कि.अ. ८,००,०००/- रू मुददेमाल जप्त करण्यात आला.
सदरची कामगीरी श्री बच्चन सिंग पोलीस अधिक्षक अकोला, श्री अभय डोंगरे अपर पालीस अधिक्षक, श्री सतिष कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री मनोज बहुरे पोलीस निरीक्षक रामदासपेठ यांचे मार्ग दर्शनाखली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जोगदंड पो. हवा. शेख हसन शेख अब्दुल्ला, पो. कॉ. श्याम मोहळे पो. कॉ. आकाश जामोद, संतोष गवई सर्व नेमणुक रामदापेठ, अकोला व पो. नी जयप्रकाश यादव, पोहवा ज्ञानसिंग, सत्यद्र कुमार, रवी कुमार, गौरव कुमार, उत्तर प्रदेश स्वाट, व पोनी चंद्रकांत सिंह व वहीद खान, थमेद्र सिंह मोरावा पोलीस स्टेशन उत्तरप्रदेश यांनी केलेली.