
दि.१२.०२.२०२५ रोजी मा. पोलीस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चनसिंह यांचे मार्गदर्शनमध्ये रोड सेफ्टी व सायबर अवरनेस बाबत बैठक घेण्यात आली. बैठकमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, शहरातील पो.स्टे. चे ठाणेदार विवीध शाळांचे व कॉलेजचे मुख्याध्यापक/प्राचार्य, प्रतिनीधी हे प्रामुख्याने उपस्थित होते. मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चनसिंह यांनी रोड सेफ्टी विशेषता हेलमेट न वापरामुळे भारतात होणारे मृत्यु, दुखापत याबाबत माहिती दिली. हेलमेटचे वापरामुळे अपघातामध्ये मृत्यु, दुखापत यांचे कमी होणारे प्रमाण याबाबत सप्रमाण माहीती देण्यात आली.
हेलमेटवापराबद्दल येणारी अडचणी त्यावरील उपाय योजना, संसाधने बाबत चर्चा करून विविध प्रश्नांचे समर्पक व समाधानकारक उत्तरे दिले तसेच सद्यस्थितीत सायबर अपराधमध्ये मोठ्या प्रमाणात तकार प्राप्त होत असुन यावर प्रतिबंध करण्यासाठी शिक्षक विद्यार्थी यांनी सजग राहणे बाबत आवाहान करण्यात आले.
अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे रोड सेफ्टी हेलमेट जनजागृतीसाठी सुरू असलेल्या ड्राईव्ह करीता बैठकमध्ये उपस्थित असलेले शहरातील विवीध शाळांचे व कॉलेजचे मुख्याध्यापक / प्राचार्य, प्रतिनीधी हे बदलाचे प्रतिनीधी म्हणुन कार्य करतील असे आवाहान अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.