पोलीस स्टेशन खदान अकोला जि. अकोलाचे हृदित प्राणघातक हमला करणारे दोन अन्‌ओळखी इसमांची माहिती

अकोला शहरातील पोलीस स्टेशन खदान अकोला येथे फिर्यादी नामे राहुल मनोहरराव घोडे वय ३५ वर्ष धंदा- वाहन चालक, रा. रेणुकानगर, डाबकी रोड अकोला यांनी दि. ३१.०८.२०२४ चे रात्री दरम्यान जबाणी रिपोर्ट दिला की, ते रामप्रकाश बन्सलोचन मिश्रा वय ५५ वर्ष रा. साई ईगल अपार्टमेंट, माधवनगर अकोला यांना नागपुर एअरपोर्ट येथुन घेवून त्यांचे वाहन कं. एमएच-३०-एएच-१००१ (फोरच्युनर) नी दि. ३०.०८.२०२४ चे अं. २२.१५ वा. येवून दोघेही वाहनातुन खाली उतरून फिर्यादी हा पार्किंगचे गेट उघडत असतांना त्यादरम्यान एक इसम तोंडाला मास्क लावलेला चाकुने रामप्रकाश बन्सलोचन मिश्रा यांचेवर वार करून हमला करीत असतांना त्यांचेमध्ये झटापट होत असतांना फिर्यादी त्यांचे जवळ गेले असता हमला करणारा इसम पळुन गेला व थोड्याच अंतरावर एक काळया रंगाची पल्सर मोटार सायकल घेवून उभ्या असलेल्या इसमाचे विना नंबर प्लेटच्या गाडीवर बसुन जयभोले किराणा शॉपकडे पळून गेले पळुन गेलेल्या इसमांचे वर्णन वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष वयोगटातील असुन दोघांचेही तोंडाला मास्क लावलेले होते, अंगात फुलपॅन्ट व फुल बाहयाचे शर्ट, दोघांचे पायात स्पोर्ट शुज, एकाच्या डोक्यात कॅप असलेला अशा वरील दोन अन्‌ओळखी इसमां विरूध्द पो.स्टे. ला अप.नं. ६२८/२०२४ कलम १०९, ३(५) बिएनएस प्रमाणे गुन्हां नोंद करण्यात आला आहे.

अशा वरील वर्णनाचे इसम मिळुन आल्यास पो.स्टे. खदान अकोला तसेंच स्थानिक गुन्हें शाखा अकोला किंवा नजिकच्या पोलीस स्टेशनला खालील मोबाईल नंबरवर माहिती देण्यात यावी, माहिती देणा-याचे नांव गुप्त ठेवण्यात येईल तसेंच योग्य ते बक्षीस देण्यात येईल.

संपर्क :- १) पोलीस निरीक्षक किशोर शेळके,

ठाणेदार पो.स्टे. खदान, अकोला (मो.नं. ९४२२९५८६१५.)

फोन नं. ०७२४- २४२३३२.

२) पोलीस निरीक्षक शंकर शेळके,

स्थानिक गुन्हें शाखा, अकोला (मो.नं. ९९२१०३८१११.)

Leave a Reply

Your email address will not be published.