अकोला प्रतिनिधी: सदर पोलीस भरतीकरीता एकुण २१८५३ उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज नरले असुन त्यामध्ये १६१६१ पुरुष उमेदवार, ५६९१ महिला उमेदवार तसेच तृतीयपंथी पुरुष उमेवार ०१ असे आहेत. उमेदवारांना दिनांक १९.१.२०२४ पासुन शारीरीक तसेच कागदपत्रे पडताळणी चाचणीकरीता पोलीस मुख्यालय, निमवाडी अकोला येथे सकाळी ५.०० वा पासुन बोलाविण्यात येणार असुन सुरुवातीचे दोन दिवस सर्वसाधारण प्रवर्गातील पुरुष उमेदवार दिनांक १९.६.२०२४ व २०.६.२०२४ रोजी ८०० उमेदवार बोलाविण्यात येणार आहेत. दिनांक २१.६. २०२४ व २२.६.२०२४ रोजी १००० उमेदवार बोलाविण्यात येणार असुन त्यानंतर दिनांक २४.६.२०२४ पासुन ते दिनांक १.७.२०२४ पावेतो १५०० उमेदवारांना बोलाविण्यात येणार आहे. दिनांक २.७.२०२४ रोजी १०६२ सर्वसाधारण पुरुष उमेदवार बोलाविण्यात येणार असुन त्यानंतर भुकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, अनाथ, तृतीयपंथी, होमगार्ड, पोलीस पाल्य, खेळाडु, प्रकल्पग्रस्त, ई. सर्व पुरुष उमेदवार यांना दिनांक ३.७.२०२४ रोजी बोलाविण्यात येणार आहेत.
दिनांक ४.७.२०२४ पासुन ते ५.७.२०२४ पावेतो दर दिवशी १५०० महिला आरक्षणातील सर्व महिला उमेदवार तसेच दिनांक ६.७.२०२४ रोजी उर्वरीत महिला आरक्षणातील १०५४ महिला उमेदवार तसेच १०२ महिला भुकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, अनाथ, होमगार्ड, पोलीस पाल्य, खेळाडु, प्रकल्पग्रस्त ई. असे एकुण ११५६ महिला उमेव्वारा यांना मैदानी चाचणी व कागदपत्रे पडताळणीकरीता बोलाविण्यात येणार आहे. दिनांक ८.७.२०२४ रोजी उर्वरीत १५३५ सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारांना बोलाविण्यात येणार आहे. सदरची भरती प्रक्रीया एकुण १७ दिवस चालणार असुन त्यामध्ये रविवारी एक दिवस भरती प्रक्रीयेला विराम देण्यात आलेला आहे.
उमेदवारांची १०० मिटर, ८०० मीटर, व १६०० मिटर धावण्याचे चाचणी ही अधीकाअधीक पारदर्शक
होण्याकरीता तांत्रीक उपकरणांचा (RFID) वापर करण्यात आलेला आहे. उमेदवारांचे उंची व छाती मोजण्याकीता
सुध्दा तांत्रीक साधणांचा (PST) वापर करण्यात येणार आहे. उमेदवारांची ओळख तांत्रीक उपकरणांच्या साहयाने (BIOMETRIC) करण्यात येणार आहे. पावसाळयाचे दिवस असल्याने पावसामुळे भरती प्रक्रीयेमध्ये व्यत्यय येवू नये व उमेदवारांची गैरसोय होवू नये याकरीता उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. ज्या उमेदवारांना भरती करीता दोन ठिकाणी एकाच दिवशी किंवा लागोपाठ मैदानी चाचणीकरीता व कागदपत्रे पडताळणी करीता तारीख देण्यात आलेली आहे. अश्यांना एका ठिकाणची पडताळणी करुन दुस-या जिल्हयाकरीता किमान ४ दिवसांचे अंतराने पोलीस शिपाई भरतीकरीता बोलाविण्यात येईल. उमेदवारांना अडचण किंवा शंका असल्यास त्यांनी raunak.saraf@mahait.org यावर ईमेल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सदर पोलीस भरती अत्यंत पारदर्शक व शिस्तप्रिय पध्दतीने होणार असुन त्यासाठी ३० पोलीस अधीकारी व २३२ पोलीस अंमलदार पोलीस भरतीचे
मैदानात बंदोबस्ताकरीता नियुक्त करण्यात आले आहेत.
तसेच उमेदवारांचे वतीने कोणीही डमी उमेदवार आढळून आल्यास अथवा ईतर कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब उमेदवारांनी केल्यास त्यांचेविरुध्द कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. भरती प्रक्रीयेमध्ये उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला किंवा भुलथापांना बळी पडु नये असे आवाहन पोलीस अधीक्षक यांचे वतीने करण्यात येत आहे.