
अकोला दी. ०४ वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा आघाडी पुर्व महानगर अध्यक्ष जय रामा तायडे यांनी सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन लाआलोक उपाध्याय यांच्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत यु ट्युब व इतर सोशल मिडिया वर अवमानकारक तसेच अश्लील शब्द रचना असलेले गाण्याचा व्हिडिओ उपलोड केल्या बाबत ऍट्रोसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट चे कलम ३(१) पी आणि ३ (१) क्यु प्रमाणे तसेच २९५ एक नुसार गुन्हे दाखल करणे बाबत तक्रार केली आहे.ठाणेदार श्री मडावी यांनी रितसर कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले.गुन्हे दाखल न झाल्यास तसेच कायदेशीर कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी युवा आघाडी च्या वतीने देण्यात आला.
सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन ला वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा प्रसिध्दप्रमुख सचिन शिराळे,युवा आघाडी महानगर अध्यक्ष जय रामा तायडे, रितेश यादव, रणजीत तायडे, मंगेश सावंग, राजेश बोदडे , संतोष गवई, अवधुत खडसे,सचिन कांबळे, प्रशांत वरघट , ॲड. आकाश भगत, इंजि धिरज इंगळे, सूरज दामोदर सर, आकाश गवई, सुमित तेलगोटे, विजय गवारगुरू, शुभम हिवाळे, साहिल गोपणारायन, लवेश वरघट, दिवा वानखडे, अक्षय गोपणारायन, सूरज रायबोले, मनिष डोंगरे, दीपक आदीलकर, विजय भटकर, प्रीतेश गोपनारायन, विजय खांदले, अमोल तायडे, प्रदीप नरवाडे, निशांत बागडे, आदेश दामोदर आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते….