पो स्टे रामदास पेठ हददीत मोबाईल स्नेचिंग करणारे आरोपी २४ तासात मुद्देमालासह LCB अकोला चे ताब्यात

दिनांक २०/०१/२०२५ रोजी पो स्टे रामदासपेठ जि. अकोला येथे फिर्यादी नामे आदीत्य दिपक दळवी वय २२ वर्ष रा. शेलगाव देशमुख ता. मेहकर जि. बुलढाणा हमु, संतोष सावळे याच्या घरी भाडयाने देशमुख फैल अकोला यानी दि. २१/१/२०२५ रोजी फीर्याद दिली की, दि. २०/०१/२०२५ रोजी फिर्यादी हे रस्त्याने पाई जात असतांना यातील नमुद मोटार सायकल वरील दोन अनोळखी इसमांनी मोसा वर येवुन वर्णन चालक काळया रंगाचे शर्ट व मागे बसलेला पांढ-या रंगाचे शर्ट अशा वर्णनाचे आरोपीतांनी फिर्यादी याचे दोन मोबाईल एकुण कि.अं १४,०००/-रू मुददेमाल हिसकावुन मोसा वरून पळुन गेले. अश्या फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून पो स्टे रामदासपेठ अप क २६/२०२५ कलम ३०९ (४), ३ (५) भारतीय न्याय सहींता प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपासावर आहे.सदर गुन्हयात पोलीस स्टेशन रामदासपेठ सह समांतर तपास करण्याचे आदेश मा. पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी दिल्यावरून सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान गोपनिय माहीती तसेच तांत्रिक विश्लेषणा वरून प्राप्त केली असता यातील आरोपी नामे शोएब खान शब्बीर खान वय २० वर्ष याने त्याचे साथीदारासह मिळुन यातील फिर्यादी व इतर पिडीत यांचे वेगवेगळया कंपणीचे मोबाईल मोटार सायकल ने जावुन हिसकावुन जबरी केली आहे. त्यावरून त्यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली की त्याने त्याचे जवळील मोटार सायकल ने त्याचा साथीदार विधी संघर्ष ग्रस्त बालक याचे नमुद मोबाईल जबरीने हिसकावुन चोरी केले आहे. करीता त्यांचे कडुन गुन्हयात चोरी गेलेले १) REDMI कंपणीचा जुना वापरता आकाशी रंगाचा मोबाईल कि.अं ८,००० / रू., २) REALME कंपणीचा जुना वापरता निळया रंगाचा मोबाईल कि. अं ६,००० / रू., तसेच गुन्हा करणे करीता वापरलेली काळया रंगाची जुनी वापरती HERO कंपणीची SPLENDER + विना नंबरची मोसा किं अ. ७०,०००/रू असा एकुण ८४,०००/रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला नमुद मोबाईल हे गुन्हयातील असल्याची IMEI खात्री झाली असुन नमुद आरोपी तसेच जप्त मुद्देमाल पोलीस स्टेशन रामदास पेठ येथे पुढील तपास करीता देण्यात आले आहे.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा, मा. अपर पोलीस अधिक्षक, श्री अभय डोंगरे सा. यांचे मार्गदर्शना खाली पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला. सहा. पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोउपनि. गोपाल जाधव, पोहवा फिरोज खान, सुलतान पठाण, वसीमोददीन, खुशाल नेमाडे, पो. कॉ आकाश मानकर, धिरज वानखडे, मो. आमीर, सतीष पवार यांनी केली,

Leave a Reply

Your email address will not be published.