अकोला प्रतिनिधी:दिनांक ०६/०७/२०२४ रोजी सकाळी ०६.३० वा. चे सुमारास पो.स्टे. रामदास पेठ, अकोला येथे श्री सतिश कुलकर्णी, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अकोला साहेब यांना मिळालेल्या गोपनिय माहिती वरून SDPO कार्यालय शहर विभाग येथील पथक व स्थानीक गुन्हे शाखा येथील पोउपनि विजय घुगे आणि स्टाफ तसेच पो स्टे रामदास पेठ येथील डि.बी. कर्मचारी यांनी ताजना पेठ चौकी मागील कागजीपुरा येथुन कत्तली करीता अवैध्दरित्या निर्दयतेने जनावरे घेवुन जाणा-या टाटा इंन्ट्रा गाडी क्रमांक एम एच ३० बी डी ५३९८ मध्ये १७ व महींन्द्रा कं. ची झायलो गाडी क्रमांक एम एच ०४ ई एस ७३३५ मध्ये ११ असे एकुण २८ गोवंश जनावरे ताब्यात घेतले.
सदर माहीती मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा. तसेच मा. अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे व श्री सतिश कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अकोला व श्री शंकर शेळके, पो.नि. स्थानीक गुन्हे शाखा, अकोला यांचे मार्गदर्शनात पोउपनि विजय घुगे तसेच SDPO शहर विभाग, कार्यालय येथील पोहवा अनिल खडेकार/१०६९, पोहवा संदीप गुजाळ / १९१०, पोहवा रवि घिवे/२०९३, पोहवा विनय जाधव/२०१८, पोना मो नदीम/१४६, स्थागुशा येथील पो. हवा फिरोज्ज/५९६, पोहवा खुशाल नेमाडे/१५४५, पोकॉ अंकुश/१२५९ पो स्टे रामदास पेठ येथील पोहवा टापरे/१२३५, पोकॉ शाम /२१५७ यांनी कागजीपुरा येथील बकरा मटण मार्केट येथे सापळा रचुन टाटा इंन्ट्रा गाडी क्रमांक एम एच ३० बी डी ५३९८ व महींन्द्रा झायलो गाडी क्रमांक एम एच ०४ ई एस ७३३५ थांबविले असता इसम नामे १) रफीक शाह खैराती शाह वय २८ वर्ष, रा. वाकापुर रोड, नायगांव, अकोट फाईल, अकोला, २) जुनेद एकबाल शेख रूस्तम वय ३० वर्ष, रा. वाकापुर रोड, नायगांव, अकोट फाईल, अकोला यांना जागीच पकडले तर एका वाहनातील गाडी चालक व अधिक एक इसम गाडी सोडुन पळुन गेले त्यांचा पाठलाग केला असता ते मिळुन आले नाही. तसेच दोन्ही गाडीमध्ये मागील बाजुस कत्तली करीता निर्दयतेने दोरीने बांधुन घेवुन जात असलेले २८ गोवंश जातीचे जनावरांची एकुण कि.अं. ४,५०,०००/- रू व तसेच टाटा इंन्ट्रा कंपनीची माल वाहक गाडी क्रमांक एम एच ३० बी डी ५३९८ अं. किंमत ७,५०,०००/- रू व महिंद्रा झायलो कंपनीची सवारी गाडी क्रमांक एम एच ०४ ई एस ७३३५ अं. किं. ३,००,०००/- रू असे एकुण १५,००,०००/- रू चा मुददेमाल कारवाई करून जप्त केला. पुढील तपास रामदास पेठ पोलीस करीत आहे.