फुले आंबेडकर विद्वत सभा द्वारे संविधान दिनानिमित्त व्याख्यान संपन्न..

स्थानिक: वाशिम, फुले आंबेडकर विद्वत सभा जिल्हा वाशिम च्या वतीने संविधान दिनानिमित्त आयोजित व्याख्यान आज दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न झाले सदरील व्याख्यानाचे अध्यक्ष स्थान मा.डॉ.हेमंत वंजारी सर उपप्राचार्य राजस्थान कॉलेज वाशीम यांनी भुषविले, तर कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक या.माणीकराव सोनोने यांनी केले,सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक वाशीम मिलींद अरगडे यांनी केले, मा.प्राचार्य डॉ.विठ्ठलराव खाडे सर, डॉ.तुषार गायकवाड यांनी मार्गदर्शन केले, या कार्यक्रमात मा.एडव्होकेट वैशालीताई डोळस यांनी भारतीय संविधान किती उपयुक्त आहे, कोणत्या घटकांना अधिकार संविधानाने मिळाले या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले

अध्यक्षीय समारोप करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. उपप्राचार्य डॉ.हेमंत वंजारी यांनी संविधानाचे महत्त्व विशद केले.कार्यक्रमाच्या शेवटी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन जिल्हा समन्वयक संतोष पट्टेबहादूर यांनी केले.सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक वाशीम प्रा मुकुंद वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा समन्वयक संतोष पट्टेबहादूर यांनी केले, सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा समन्वयक डॉ.दिपक जमधाडे, कैलास मिटकरी, हरिदास बनसोड,कडुजी साबळे यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published.