पीएच. डी पूर्व परीक्षा तात्काळ घ्या विद्यार्थी नेते आकाश हिवराळे यांची प्र- कुलगुरू व परीक्षा नियंत्रक यांना मागणी

रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे निवेदनाद्वारे मागणी-

प्रतिनिधी/
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ची पीएच.डी पूर्व परीक्षा अद्यापपर्यंत झाली महाराष्ट्रातील बहुतांश विद्यापीठाची परीक्षा झाली आहे व आपल्या विद्यापीठात पीएच.डी करू इच्छुक विद्यार्थी अद्याप प्रतीक्षेत आहेत त्यामुळे यावर तात्काळ परीक्षेच्या तारखा जाहीर करा.व चालू शैक्षणिक सत्रात वाढविण्यात आलेली प्रवेश फी व परिक्षा फी हि कमी करण्यात यावी.परीक्षा आवेदन भरण्याची ऑनलाईन प्रक्रियेकरिता शुल्क न आकारण्याबाबत चे तात्काळ प्रपत्र काढून विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक थांबविण्यात यावी.प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्यात यावी.

अशा विविध मागण्या चे निवेदन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ चे प्र-कुलगुरू डॉ.विजयकुमार चौबे, कुलसचिव,परीक्षा नियंत्रक मोनाली टोटे यांना रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी आकाश हिवराळे जिल्हासंघटक रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद,विठ्ठल लोथे,सुरेंद्र अवचार,रोशन तायडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.