
अकोला:
स्थानिक अकोला शहरात शांतता नांदावी यासाठी पोलीस नेहमीच आपले कर्तव्य चोख बजावत असून सर्व नागरिक आपले सण उत्साहात साजरे करतात. येणाऱ्या सणांचा विचार करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, होळी, शब-ए-बारात या सारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात ठाणेदार किशोर शेळके यांनी शांतता समिती सदस्यांची बैठक आयोजित केली होती.
यावेळी शांतता समितीचे सदस्य हाजी मॅडम खान, मनीष हिवराळे, माजी उपमहापौर राजेंद्र गिरी, माजी नगरसेवक मो.इरफान, सागर शेगोकार, बुधन गाडेकर, हरिभाऊ काळे, महेंद्र डोंगरे, जावेद तेली, कैलास रणपिसे, शकूर खान लोधी, अँड. देवाशिष काकड धम्मपाल मेश्राम, संजय हिरानंदानी, मनोहर लाल मल्होत्रा, दिलीप खत्री, गुप्तचर विभागाचे किरण गजानन देशमुख यांच्यासह शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.