
स्थानिक अकोला मनोज बहुरे पी आय पो. स्टे रामदास पेठ येथे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक 10/4/23 रोजी 5/30 ते 6/30 वा पर्यंत मराठा मंगल कार्यालय येथे आगामी सण उत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच रमजान उत्सव निमित्त शांतता समिती तसेच उत्सव पदाधिकारी यांची मीटिंग घेण्यात आली. मीटिंग मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान उत्सव संबंधाने त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांचे निवारण करण्यात आले.

तसेच आगामी सण उत्सव उत्साहात साजरा करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून जातीय सलोखा कायम राखण्याचे आव्हान करण्यात आले. मिटींगला हाजी मुद्दाम खा अब्दुल करीम, माजी उप महापौर राजेंद्र गिरी,संजय हिरानंदानी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व मुख्य संपादक महेंद्र डोंगरे मनोहरलाल मल्होत्रा,जावेद तेली,माजी नगरसेवक मो इरफान, मोईन खान उर्फ मोंटू,धम्मपाल मेश्राम, पत्रकार बुडन गाडेकर, रजा अकॅडमीचे अध्यक्ष इमरान चव्हाण, नंदू कोल्हटकर नागेश बागडे मारुती वासनिक कुणाल राऊत कपिल राऊत संतोष नितोने धीरज गणवीर तबरेज भाई तसेच भारतीय बौद्ध महासभा अकोला चे डॉ. अरुण चक्रनारायण व शांतता समितीचे असे 38 ते 40 पदाधिकारी हजर होते.