
अकोला पातूर : दिनांक – 03/11/2022 रोजी नुकत्याच झालेल्या पंचायत समिती सभापती तथा उपसभापती निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी यांना ईश्वरी कॉल मिळून सभापती तथा उपसभापती दोन्ही पदे वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात ईश्वर चिट्टीच्या माध्यमातून पडली सभापती पदी सुनीताताई अर्जुन टप्पे,उपसभापती पदी इमरान खान मुमताज खान दोन्ही पदे वंचित बहुजन आघाडी मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडी पातुर तालुका वतीने मोठ्या जल्लोषात सभापती उपसभापती यांचा पदग्रहण सोहळा घेण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीची विजय मिरवणूक रॅली बँड बाजाच्या जल्लोषात महात्मा फुले स्मारक संभाजी चौक पातूर येथून पंचायत समितीपर्यंत काढण्यात आली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विजय मिरवणुकी दरम्यान मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले. तसेच तालुका भरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने विजय रॅलीमध्ये उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद नवनिर्वाचित अध्यक्ष तथा उपाध्यक्ष नवनिर्वाचित जिल्हा परिषदेचे सभापती गण यांचा सत्कार समारंभ सुद्धा पंचायत समिती पातुर येथे घेण्यात आला.पं.स पातुर येथे दशकभरापासून पहिल्यांदाच एवढे जल्लोषात पदग्रहण सोहळा घेण्यात आला.

या पदग्रहण सोहळ्याला वंचित बहुजन आघाडी प्रदेश कार्यकारणी जिल्हा कार्यकारणी प्रामुख्याने उपस्थित होते.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, सत्कारमूर्ती जिल्हा परिषद अध्यक्षा संगीताताई आढाव तथा उपाध्यक्ष सुनील फाटकर, समाज कल्याण सभापती आम्रपालीताई खंडारे,जिल्हा परिषद सभापती रिजवाना ताई,जिल्हा परिषद सदस्य मायाताई नाईक, जिल्हा परिषद सभापती योगिताताई रोकडे,जिल्हा परिषद सदस्य नीताताई गवई,जिल्हा परिषद सदस्य सावित्रीताई राठोड, तालुका कार्यकारणीतून तालुकाध्यक्ष डॉ.ओम प्रकाश धर्माळ,चरणसिंग चव्हाण, किरण सरदार,विक्रम जाधव, मंगेश गोळे, राजू बोरकर,अलका सरदार,करुणा गवई,निमा राठोड, रेखा इंगोले,अर्चना डाबेराव,श्याम ठाकरे,नूर्खा सर,अरविंद महल्ले, धर्माजी सुरवाडे,विश्वास खुळे, मोबीन भाई,संजय लोखंडे,गणेश गवई,प्रकाश वाहुकार,विजय आखरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी पातुर तालुका कार्यकारिणीचे सर्व सदस्य व महिला सदस्य गण प्रामुख्याने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी मंगेश गोळे,मनोज गवई,चंद्रकांत तायडे, राजीक भाई,दिनेश गवई, नितेश हिवराळे,अनिल राठोड, धीरज इंगळे,जयदीप गवई,राहुल जाधव,मिलिंद धाडसे,बालू सुरवाडे,प्रवीण पोहरे,यांनी सहकार्य केले.