पातूर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचा IPS अधिकारी मा. गोकुळ राज यांच्या हस्ते सन्मानित

पातूर / प्रतिनिधी

पातूर – दि : 22/10/2022 श्री रेणुका माता संस्थान येथील नवरात्री उत्सव, दसरा महोत्सव व धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणूक दरम्यान संपूर्ण उत्सव व मिरवणूक कालावधीत एकही गुन्हा होऊ दिला नाही.अत्यंत जबाबदारी व सतर्क आणि शिस्तीचे पालन करून बंदोबस्त केला त्यामुळे पातूर पोलीस स्टेशन येथे IPS अधिकारी मा. श्री. गोकुळ राज, पो. स्टे. कर्तव्यदक्ष ठाणेदार मा. हरिष गवळी,सहाय्यक उपनिरीक्षक मीरा सोनुने, उपनिरीक्षक मा. माजिद पठाण यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन टीमला फोटो फ्रेम व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी मा.गोकुळ राज यांनी पोलीस बॉईज असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांसोबत विविध विषयावर चर्चा करून कामाची प्रशंसा केली व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन पोलीसांच्या न्याय हक्क व कुटूंबासाठी झटणारी संघटना आहे.पोलीसांच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये पाच टक्के आरक्षण देणारी एकमेव संघटना आहे.यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन पातूर शहर विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अर्जुनसिंह गहिलोत, उपाध्यक्ष अविनाश पोहरे, सहसचिव अविनाश गवई, रवि चव्हाण, पवन सुरवाडे, सय्यद तौसिफ़, सतीश कांबळे,कू. सुवर्णा चव्हाण, कू. कोमल हिवराळे, कू. दिव्या वगरे, कू. लक्ष्मी कौलकार,
करण राठोड, आशिष राठोड, गौरव सरदार, रोहन राठोड आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.