सिसिटीएनएस रॅकींग मध्ये अकोला जिल्हयाने राज्यात ४६ घटकांपैकी ७ रा क्रमांक पटकावला

तर अमरावती परीक्षेत्र प्रथम क्रमांकावर

स्थानिक अकोला :

गुन्हे अन्वेषण विभागा पुणे यांनी जाहीर केलेल्या माहे जूलै २०२३ ची सिसिटीएनएस रॅकींग मध्ये अकोला जिल्हयाने राज्यात ४६ घटकांपैकी ७ रा क्रमांक तसेच अमरावती परीक्षेत्रात प्रथम क्रमांक पटकाविलेला आहे.पोलीस दलाच्या कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी सीसीटीएनएस (क्राईम क्रीमीनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टम) प्रणाली सुरू केली आहे यात अभीलेख्यांची ऑनलाईन नोंदणी केली जाते. सीसीटीएनएस प्रणालीत देशपातळीवरील गुन्हे व माहीती यामध्ये उपलब्ध होते त्यामध्ये ई-तक्रार, अनोळखी मृतदेह शोधने, गुन्हे प्रतिबंध कारवाई, वाहनांची पडताळणी करणे, गुन्हे उघडकीस आणने आदी करीता ही प्रणाली महत्वाची ठरते. सीसीटीएनएस मध्ये पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयांपासून ते तपास व दोषारोपपत्र इत्यादी १८ प्रकारची माहीती उपलोड करावी लागते.उपरोक्त माहीतीचा प्रत्येक महीण्याला गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांचेकडून आढावा घेतला जातो, गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पो. महासंचालक प्रशांत बुरडे यांनी माहे जुलै २०२३ महीण्याचा अहवाल जाहीर केला असता त्यामध्ये एकुन ४६ घटकांपैकी अकोला पोलीस दलाने २०१ पैकी १७४ गुण (८७ % ) प्राप्त करून राज्यात ०७ वा क्रमांक तसेच अमरावती परीक्षेत्र, अमरावती विभागातुन प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे.पोलीस अधीक्षक, संदिप घुगे, नोडल अधीकारी तथा अपर पो. अधीक्षक अभय डोंगरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. उपनिरीक्षक प्रशांत पाटील नापोकॉसतिश भातखडे, पोकॉ शुभम सुरवाडे यांनी यासाठी परीश्रम घेतले तसेच पोलीस स्टेशन व उपविभागीय स्तरावरील सीसीटीएनएस अंमलदारांचेही यामध्ये महत्वाचे योगदान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.