
राजे शाही चे प्रतीक सेंगोल चा केला विरोध..
नवीन संसद भवनास संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे बाबत व राजेशाहीचे प्रतीक सेंगोल राजदंड म्हणून नाकरण्या बाबत आज सम्राट अशोक प्रतिष्ठान चे वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांना कार्यालयात निवेदन देण्यात आले या प्रसंगी सम्राट अशोक प्रतिष्ठान चे प्रा विजय आठवले प्रा डॉ बाळकृष्ण खंडारे,निरंजन भाऊ वाकोडे,प्रा डॉ संदीप भोवते अनिल भाऊ गवई,विद्याधर मोहोड,मंदाताई शिरसाट,संदेश गवई इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती सम्राट अशोक प्रतिष्ठान चे वतीने देण्यात आलेल्या निवेदनातनुकतेच भारताच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले आहे असे म्हटले असूनभारतात संसदीय लोकशाही व्यवस्था निर्माण करण्यात संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रचंड योगदान असून भारताच्या जडण घडणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोलाचे कार्य केलेले आहे असे म्हटले आहे,विविध भाषा ,प्रांत, धर्म,पंथ,हजारो जाती असलेल्या भारतासाठी संविधानाच्या माध्यमातून एकसंघ व्यवस्था निर्माण करणे हे महत्त् कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहेभारताला अखंडित एक संघ ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड परिश्रमाने निर्माण केलेले भारतीय संविधान कारणीभूत ठरले,असा सुद्धा उल्लेख निवेदनात आहे.
भारतीय राज्यघटना ही जगातली महत्त्वपूर्ण राज्य घटना असून संपूर्ण भारतासाठी दिशादर्शक सिद्ध होत आहे, संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने राष्ट्र उभारणीचे काम केले भारतातील जल निती ,वीज,शेती,सिंचन,धरणे,नदी जोड, प्रकल्प,इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अतुलनीय असून शेकडो वर्ष शिक्षण,व विकासापासून उपेक्षित समूहाला मानवी हक्क प्रदान करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर पहिले महापुरुष आहेत असे सुद्धा निवेदनात नमूद आहे हजारो वर्ष शोषित असलेल्या महिलांना,हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून न्याय देणारे, कामगार, शेतकरी ,शेतमजूर, अल्पसंख्यांक समूह, अनुसूचित जाती,जमाती,इतर मागास , सर्वांना समान न्याय, संधी,राजकीय सामाजिक,शैक्षणिक अधिकार देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असे निवेदनात म्हटले आहेसंविधान निर्मिती मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान लक्षात घेता, देशातील संसदीय लोकशाहीचे ते खऱ्या अर्थाने निर्माते ठरतात,असे सुद्धा म्हटले आहे म्हणून संसद भवनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देवून भारताचा आणि संसद भवनाचा गौरव होणार आहे असे निवेदनात म्हटले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, व लोकभावणनेची दखल घेत नवीन संसद भवनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे तसेच संविधान सभेने अशोक चक्र, अशोक स्तंभ या प्राचीन प्रतिकाना राष्ट्रीय प्रतीक म्हणून मान्यता दिलेली आहे असे सुद्धा निवेदनात नमूद आहे बौद्ध धम्माचा गौरवशाली वारसा, समता, न्याय, स्वतंत्रता, बंधुता, अहिंसा,लोकशाही,लोककल्याणकारी व्यवस्थेचे प्रतीक अशोक स्तंभ असून ,अशोक स्तंभ,राष्ट्रीय प्रतिकाचे महत्व अबाधित ठेवणे शासनाने काम असताना भारताचे प्रधानमंत्री यांनी. सें गोल या राजेशाही प्रतिकाला नवीन संसद भवनात राज दंड म्हणून प्रतिस्थापित केले, यातून भारताचे राष्ट्रीय प्रतीकअशोक स्तंभाची अवहेलना झाली असा आरोप सुद्धा करण्यात आला आहे सेंगोल मुळे संविधानवादी ,लोकशाही. ,धर्म निरपेक्षता मानणाऱ्या भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत असं सुद्धा निवेदनात नमूद केले आहेराजे शाही तील राजाचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी , सत्ता हस्ततरांचे, राजेशाही चे प्रतीक सेंगोल आहे तर अशोक स्तंभ समता न्याय बंधुता लोकशाही चे प्रतीक असून सुद्धा सरकार कडून सेंगोल चा प्रचार हा धर्माधिष्ठित राजकिय व्यवस्था निर्माण करण्याचा डाव असून देशाच्या धर्मनिरपेक्षेतील हानी पोहोचवणारे आहे, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
राजदंड ,राष्ट्रीय प्रतीक म्हणून नवीन संसदेत अशोक स्तंभ असावा, लोक भावनेची दखल घेत खालील मागण्या पूर्ण कण्यात याव्या असे म्हटले आहे. नवीन संसद भवनास संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊ गौरव करावा लगतोयp.. राजेशहीचे प्रतीक सेंगोल ऐवजी लोकशाहीचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून नवीन संसदेत राजदंड म्हणून अशोक स्तंभाचा पुरस्कार केला जावा अशी मागणी निवेदनातून केली आहे निवेदन सादर करतानाप्रा विजय आठवलेप्रा डॉ बाळकृष्ण खंडारे प्रा सुनील कांबळे बी.जी.इंगळे सर, प्रा डॉ संदीप भोवते, निरंजन भाऊ वाकोडेमंदाताई शिरसाट प्रा शैलेश इंगळे,अनिल भाऊ गवई, विद्याधर मोहोड, संदेश गवई इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती