
साहित्य हे आंबेडकरी चळवळीचा गाभा आहे – आ. की. सोनोने यांचे प्रतिपादन
स्थानिक: अकोला
नालंदा प्रकाशन, कपिलवस्तूनगर,अकोला द्वारा आयोजित कवी आयु. आ. की. सोनोने यांच्या पायदळी पडलेली फुले या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी कवी आ. की. सोनोने यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना जगातले पहिले महाकवी म्हणजे तथागत गौतम बुद्ध आहे. बुध्दांनी गाथेतून विचार मांडला. तो प्रवास आज आपल्यापर्यंत येवून पोहचला आहे. म्हणून ग्रामीण भागातून येणाऱ्या कवींनी अन्न, वस्त्र,निवारा याचा अंतर्भाव कवितेत केला पाहिजे. पद, पैसा, प्रतिष्ठा यांच्या मागे धावणारे कवी,साहित्यिक समाजाच्या बाहेर फेकल्या जातील ही वस्तुस्थिती आहे. चळवळीच्या म्होरक्यानी जबाबारीपासून पळू नये असे मत व्यक्त केले.

त्या प्रसंगी चळवळीसाठी राबणाऱ्या कवी,साहित्यिक,कलावंत,गायक यांना दीनबंधु पुरस्कार देवून गौरविण्यात आले. त्यामध्ये आयु. आत्माराम पळसपगार यांना दीनबंधू काव्यलेखन पुरस्कार, आयु. वसंतदादा मानवटकर यांना दीनबंधू कलावंत पुरस्कार, आयु. नागसेन सावदेकर दीनबंधू गीत गायन पुरस्कार, आयु. विलास अंभोरे यांना दीनबंधू कादंबरी लेखन पुरस्कार,आयु. समाधान शिरसाट यांना दीनबंधू कलापथक पुरस्कार तर आयु. आ. की. सोनोने यांना दीनबंधू जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

पायदळी पडलेली फुले या कविता संग्रहावर आयु. बी. बी. गोपणारायन , प्रा.भास्कर पाटील, आयु. सुनिता इंगळे, आयु. शीला घरडे पाटील, आयु. डॉ. रमेशचंद्र धनेगावकर माजी शिक्षणाधिकारी औंरंगाबाद, आयु. बी. जी. वाघ आयएएस नाशिक यांनी समिक्षेपर मनोगत व्यक्त केले. संविधानाचे अभ्यासक डॉ. एम.आर. इंगळे यांनी नालंदा प्रकाशनाचे धन्यवाद व्यक्त केले. आयु. विश्वनाथ शेगावकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सदर कविता संग्रहात 500 मनोभावणा आहेत. ह्या फक्त कविता नसून 95 विचार आहे. चळवळीचा सार या कविता संग्रहात असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन संजय गवई यांनी तर संविधान उद्देशिका व सन्मानपत्राचे वाचन युवा वक्ते विशाल नंदागवळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी.एल. अंभोरे,पी.जे. वानखडे,दादासाहेब साहेबराव शिरसाट,रमेश जंजाळ,समाधान जगताप,एस. टी. वानखडे, विश्वनाथ शेगावकर,प्रा. डॉ. एम.आर. इंगळे हेमंत गणवीर, राहुल तायडे,संजय गवई,देवानंद वानखडे, राजेश तायडे, डॉ. अरुण चक्रनारायण, विशाल नंदागवळी,अजय शेगावकर,अमोल वानखडे आदी मान्यवरांनी सहकार्य केले.