
स्थानिक: अकोला
काही दिवसांपूर्वी अग्रेसन चौकापासून पश्चिमेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला वसंत देसाई स्टेडियम समोरील बाजूस भूमिहीन मजूर असणाऱ्या आणि पोटापाण्यासाठी मूर्ती बनवून किंवा आपल्या कला कृतीने खेळाचे साहित्य बनवून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची दुकाने आणि घरे हटवून अतिक्रमण काढण्यात आले.
जिल्ह्यात अनेक गर्दीचे रोड आहे जिथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वसलेलं असून त्याला बाजाराचे स्वरूप येत आहे. त्याकडे दुर्लक्ष करत हातावर पोट घेवून जगणाऱ्याना छळण्याचे काम प्रशासनाच्या वतीने केल्या जाण्याचा रोष अतिक्रमण धारकांनी व्यक्त केला.
रस्त्याच्या एका बाजूला दूर अंतरावर तंबू गाढून अनेक परिवार तिथे गेल्या 30 ते 40 वर्षापासून राहत आपले उदरनिर्वाह करीत आहे. प्रत्येक सिजन मध्ये मूर्ती घडवून, विविध खेळाची सामग्री तयार करून, गोळ्या भिस्किट किंवा शैक्षणिक साहित्याची विक्री करून आपले पोट भरण्याचा प्रयत्न तेथील रहवासी करीत असतात.
थंडीचे दिवस असल्याने आणि अतिक्रमण काढल्याने त्यांना उघड्यावर थंडीत कुडकुडत रहावे लागत आहे. लहान मुले असल्याने त्यांना साप किंवा विंचू चावण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तेव्हा अशा परिसथितीमध्ये आम्ही जायचे कुठे,राहायचे कसे आणि कमावून खायचे कसे असे प्रश्न उपस्थित करत प्रशासन आम्हाला पर्यायी जागा देईल काय असे प्रश्न सदर परिवारांकडून विचारल्या जात आहे. तेव्हा वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे यांनी अतिक्रमण धारकांचे सांत्वन करत लवकरच जिल्ह्यातील आयुक्त आणि अतिक्रमण अधिकारी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यात येण्याचे आश्वासन त्यांनी दिले.