
बाळापूर:-मतदारसंघातील ५५ ते ६० या गावांतील पाणी खारं झालं आहे. त्यामुळे घरी नळ जरी असले तरी यात येणारे पाणी याच बोअरवेल आणि विहिरींचे आहे. हे क्षारयुक्ती पाणी प्यायल्याने अनेक आजार उद्भवत आहेत.
झाल्याचे समोर आले आहे. राज्यभरात किडनीच्या आजाराचे अनेक रुग्ण आहेत पण बाळापूरमधील या प्रकारमुळे एकच खळबळ माजली असून या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदारसंघातील ६० गावांतील लोकांना किडनीचे आजार झाले असून अनेक लोकांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आहेत. खारे पाणी प्यायल्याने हा आजार झाल्याचे समोर आले आहे. राज्यभरात किडनीच्या आजाराचे अनेक रुग्ण आहेत पण बाळापूरमधील या प्रकारमुळे एकच खळबळ माजली असून या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बाळापूर मतदारसंघातील ६० गावांतील लोक विहिरी आणि बोअरमधलं क्षारयुक्त पाणी पित आहेत. यामुळे किडनी स्टोन आणि किडनी संबंधीचे आजार गावाकऱ्यांना होत आहेत. तर अनेकांना किडनी फेल झाल्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळ सर्वत्र भीती पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सावरपाटी गावात तीन ते चार जणांना क्षारयुक्त पाण्यामुळे किडनीचे आजार झाले. तर एकाला आपली किडनी गमावावी लागलीय. प्रशांत काळे या व्यक्तीची किडनी पूर्णतः फेल झाली. त्यांना उपचारासाठी १२ लाखां पेक्षा जास्त खर्च आला. यासाठी त्यांनी शेती विकली तरीही फायदा झाला नाही असे त्यांनी सांगितले.