एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन प्रशंसनीय – अँड गजाननराव पुंडकर

अकोला:

श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, अकोला यांच्या इंग्रजी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट विभाग यांनी संयुक्तपणे ‘इंग्रजी शिक्षकांमध्ये शिकविण्याचे सॉफ्ट स्किल्स विकास’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.कनिष्ठ महाविद्यालयीन इंग्रजी शिक्षकांमध्ये शिकविण्याचे तंत्र आणि सॉफ्ट स्किल्सचा विकास याचे उद्घाटन श्री शिवाजी सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. गजाननराव पुंडकर यांच्या शुभहस्ते झाले. प्रमुख पाहुण्या डॉ.सुचेता पाटेकर (ईओ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, जि.अकोला), प्रमुख पाहुणे अशोकराव देशमुख (शालेय समिती सदस्य) व प्राचार्य डॉ.ए.एल.कुलट हे उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ.उज्ज्वला धांडे यांनी तर प्राजक्ता सवाई यांनी आभार मानले.

सर्जनशीलता वाढविणे: काव्य संवेदनशीलतेचा विकास या विषयावरील पहिल्या तांत्रिक सत्राचे अध्यक्ष माननीय प्रा.व्ही.टी.हजारे, डेल्टाचे अध्यक्ष डॉ.गजानन मालोकर होते. प्रा. नीशा देशमुख यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.या सत्राचे सुत्रसंचलन डॉ. अनघा सोमवंशी यांनी तर प्रा.सुशीला माळसने यांनी आभार मानले. दुसरे तांत्रिक सत्र फॅसिलिटेटर्स सॉफ्ट स्किल्स: नीड ऑफ अवर या विषयावर होते,   सोबत डॉ. नीतीन मोहोड, सॉफ्ट स्किल्स ट्रेनर आणि फॅकल्टी डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स) हे मार्गदर्शक म्हणून होते. अध्यक्षस्थानी श्री गजानन चोपडे, जिल्हा व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी, अकोला. कु. पूजा शिवरकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सत्राचे संचालन प्रा. अलका पाटील यांनी तर कु. रुतुजा मुर्‍हेकर यांनी आभार मानले.

समारोपाच्या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए.एल. कुलट होते, तर प्रमुख पाहुणे श्री.गजानन चोपडे होते.प्रमुख पाहुणे डॉ नाना वानखडे ( मानव्य विद्या प्रमुख ), डॉ. किशोर देशमुख (सांस्कृतिक समितीचे निमंत्रक) उपस्थित होते.डॉ .संतोष गायकवाड, प्रा.राहुल गावंडे, प्रा. यांनी कार्यशाळेबद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्या. सत्राचे सुत्रसंचलन डॉ.के.व्ही.म्हैसने यांनी तर प्रा.अरुणा नावकार, ए.एन.देशमुख यांनी आभार मानले.

आयोजक समितीचे अध्यक्ष डॉ.डी.बी.वानखडे यांच्यासह डॉ.नीतीन मोहोड आणि समिती सदस्य डॉ.पी.आर.वाघमारे, डॉ.रवी दाभाडे, कु.नम्रता माळी, वैभव निंबाळकर, डॉ.गणेश गायकवाड, डॉ.सी.आय. राऊत, डॉ.अनिता दुबे ,डॉ.एस.एम.चौहान डॉ.निलीमा तिडके आणि इतरांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.