नागरीकांचा मागास प्रवर्गातील (ओ.बी.सी.तील) जात निहाय जनगणनेची मागणी.
अकोला:
ओ.बी.सी. महासंघ महाराष्ट्र प्रदेश द्वारा राज्य शासनास विनंती करण्यात येते की, नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओ.बी.सी.) यांना भारतीय राज्यघटनेचे आर्टीकल ३४० अन्वये मिळालेले आरक्षण अबाधित ठेवण्यात यावे ही विनंती. तसेच या अगोदर नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओ.बी.सी.) या प्रवर्गामध्ये एकुण ३८५ जाती असुन नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओ.बी.सी.) यामध्ये “मराठा” या जातीचा समावेश करण्यात येऊ नये. तसेच मराठा समाजाला वेगळे स्वतंत्र आरक्षण दिल्यास त्यास ओ.बी.सी. महासंघ महाराष्ट्र प्रदेश यांचा विरोध राहणार नाही. तसेच ओ.बी.सी.चे आरक्षणाचे ताट वेगळे ठेवण्यात येवून मराठा समाजाचे आरक्षणाचे ताट वेगळे ठेवण्यात यावे ही विनंती. तसेच नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओ.बी.सी.) मधील ३८५ जातींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी ही नम्र विनंती.
करिता हे लेखी निवेदन आज दि. ७.१२.२०२३ रोजी सविनय सादर.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या आद. प्रा. अंजलीताई आंबेडकर ह्यांची प्रामुख्याने उपस्थित होती.
खालील संघटना सहभागी होत्या
१) मा.श्री.बालमुकुंद भिरड अध्यक्ष, ओ.बी.सी. महासंघ महाराष्ट्र
२) ॲड संतोष राहाटे
कार्याध्यक्ष, ओ.बी.सी.महासंघ महाराष्ट्र
३ गोपाल प्रकाशराव राऊत अध्यक्ष अत्यल्प समाज संघटना, प्रमोद देंडवे जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, सुभाष सातव राष्ट्रीय सरचिटणीस, अ.भा. माळी महासंघ, अनिल शिंदे, अध्यक्ष, बारा बलुतेदार संघटना, मनोहर पंजवानी, सिंधी समाज संघटना, संतोष सरोदे, महाराष्ट्र कुंभार विकास परिषद, प्रा. डॉ. संतोष हुशे, ओ.बी.सी. नेते, गजानन बोराडे, सचिव राठोड तेली पंचमंड, राजेश जावरकर, विभागीय अध्यक्ष, माळी महासंघ., रामदासजी गाडेकर, कुंभार समाज भुषण, शंकरराव गिन्हे, माळी समाज भुषन, दिलीपजी कंकर, नाथ समाज संघटना, सुभाष दातकर, अध्यक्ष, अकोला जिल्हा कुणबी समाज.., गजानन धामनकर जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सुनिल जाधव, पाथरवट समाज, गजानन वाघमारे, विभागीय अध्यक्ष, नाभिक महामंडळ, दिलीप पुसदकर, गुरव समाज, गणेश वडतकार, प्रदेश उपाध्यक्ष, सुतार समाज, डॉ. किशोर श्रीधरराव ढोणे, कुणबी समाज, स्वप्नील राम चवरे, अध्यक्ष, बेलदार संघटना, दिलीप चवरे, जिनगर समाज संघटना, जनार्दन सहारे, गोवारी समाज संघटना, दिनेश श्रीवास, नाभिक समाज संघटना, ह.भ.प. किरण महाराज बोपटे, कोळी समाज संघटना, राजेश अंभोरे, वैदू समाज संघटना, भगवान थिटे, हटकर समाज संघटना, गोपाल चव्हाण, बंजारा समाज संघटना, माणिकराव वणवे, वंजारी समाज संघटना, मखराम राठोड, बंजारा समाज संघटन, संतोष साळुंके, नाथजोगी भराडी समाज संघटना, डॉ. प्रकाश दाते, अध्यक्ष, अ.भा. माळी महासंघ, मनिष रूले, विश्वकर्मा समाज संघटना, सुनिल जाधव, पाथरवट टकारी, गुणवंतराव वाकरे, शिंपी समाज, डॉ. गजानन करे, सोनार समाज, राम यवतकर, अध्यक्ष, सुतार समाज संघटना, गोरसिंग राठोड जिल्हाध्यक्ष गोर. सेना अकोला, प्रदिप मांगुळकर जिल्हाध्यक्ष, कुंभार समाज युवा संघटना, संजय वाडकर जिल्हाध्यक्ष कुंभार समाज सामाजिक संस्था अकोला यांच्यासह सौ. वर्षा पिसोडे, डॉ योगेश साहु, नंदकिशोर निलखन, विनोद राऊत, रामहरी अघडते, गोपाल कोल्हे, प्रदिप वानखडे, डॉ निलेश उन्हाळे, संतोष सरोडे, अमोल कलोरे, मुश्ताक शहा, गोपाल ढोरे, तेजस्विनी राहाटे, किरण बोराखडे, विजया भिरड, एड. हेमंत सपाटे, प्रविण निलखन, अशोक गाडगे, गणेश म्हैसने, हेमराज काळपांडे, अनंत अवचार, सौ. मंतोषताई मोहोळ, सुरेश पाटकर, गजानन गवई, विकास सदांशिव आदी पदाधिकारी उपस्थित होते.