
जातीय दंगल घडविण्याचे षडयंत्र असल्याचा संशय
स्थनिक : अकोला येथे श्री शिवप्रतिष्ठाण हिन्दुस्थान अकोला विभाग या संघटनेमार्फत जातीयवादी विचारसरणीचा व नेहमी जातीय दंगल घडविण्याच्या दृष्टीने वक्तव्य करणारे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या सभेचे आयोजन दिनांक ३० जुलै रोजी पातूर व ओम मंगल कार्यालय, बाळापूर रोड, जुने शहर अकोला येथे करण्यात आले आहे. करीता त्या सभा रद्द करण्यासाठी बौध्द समाज संघर्ष समिती अकोला यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
अकोला शहर हे महाराष्ट्रातील अतिसंवेदनशील शहर म्हणुन ओळखल्या जाते. अकोला शहरामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने संसार करीत आहेत. परंतु मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हे नेहमी महाराष्ट्रातील महापुरुषांविषयी नेहमी अवमानजनक वक्तव्य करतात त्याचप्रमाणे ते दोन धर्मामध्ये व जातीमध्ये तेढ निर्माण होईल, जातीय दंगल घडवुन आणण्याच्या दृष्टीने जातीयवाचक व द्वेषपुर्ण वक्तव्य करतात. या अगोदर सुध्दा त्यांच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगली घडलेल्या आहेत.
मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी नुकतेच अमरावती येथे सुध्दा भारताचे राष्ट्रपिता म्हणुन ज्यांना ओळखले जाते असे म. गांधी व त्यांच्या कुटुबियांविषयी अवमानजनक वक्तव्य केल्याने त्याच्या विरुध्द अमरावती येथे महापुरुषांची विटंबना केली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अकोला शहरात नुकतेच हिंदु-मुस्लीम ची मोठ्या प्रमाणात दंगल घडलेली आहे व अकोला शहरातील तणावपुर्ण स्थिती व वातावरण अद्यापपर्यंत शांत झालेले नाही. मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हे अकोला जिल्ह्यातील पातूर, अकोला व इतर ठिकाणी होणाऱ्या सभेमध्ये परत दोन धर्मामध्ये व जातीमध्ये दंगल घडविण्याच्या दृष्टीने वक्तव्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान अकोला या संघटनेने सुध्दा अकोला शहरातील संवेदनशिल व तणावपुर्ण वातावरणाची व परिस्थीतीची जाण लक्षात असुनही सदर मनोरुग्ण मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांची सभा आयोजित केली आहे. सदर सभेस सर्व बौध्द समाज संघर्ष समिती अकोला व इतर बहुजन समाजाचा त्यास विरोध आहे. अकोला जिल्हा प्रशासन व अकोला जिल्हा पोलीस दल यांना विनंती आहे की मनोरुग्ण मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांची सभा अकोला जिल्ह्यामध्ये आयोजित केलेली आहे ती तात्काळ रद्द करावी अन्यथा आम्ही कायदेशीर मार्गाने सदर सभेला विरोध करुन सदर सभा उधळुन लावू, तसेच मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे याच्या वक्तव्यामुळे अकोला जिल्ह्यामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अकोला जिल्हा प्रशासन, अकोला जिल्हा पोलीस दल व श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान अकोला विभाग यांची राहिल याची आपण नोंद घ्यावी असे मत व्यक्त केले.