
अकोला – मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्थित बांडक साहेब यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या “ऑपरेशन प्रहार” या विशेष मोहिमेअंतर्गत, दि. ०६ जुलै २०२५ रोजी अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या पथकाने दुर्गानगर परिसरात गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून जुगार खेळणाऱ्या ६ आरोपींना ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला:
२ मोटारसायकल्स (किंमत: ₹१,६०,०००/-)
५ मोबाईल फोन्स (किंमत: ₹१३,०००/-)
रोख रक्कम: ₹७,०५०/-
एकूण मुद्देमाल: ₹२,२०,०५०/- रुपयांचा
या धाडीत पो.नि. शेठा रहीम यांच्या नेतृत्वाखालील पथकात एएसआय अनिस पठाण, पो.हवा प्रशांत इंगळे, योगेश काटकर, संतोष चिंचोळकर, हर्षल श्रीवास, गिरीश तिडके, ईमरान शाह आणि अमिर यांचा समावेश होता.
या मोहिमेअंतर्गत जुगार अड्डे, अवैध दारू विक्रेते, दंगलखोर, तडीपार आरोपी तसेच फरार गुन्हेगारांवर सातत्याने धडक कारवाई करण्यात येत आहे. “ऑपरेशन प्रहार” हे अकोट फाईल परिसरातील अवैध कृत्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबवले जात असून नागरिकांतून या मोहिमेचे जोरदार स्वागत होत आहे.
ही कारवाई मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे व मा. उपविभागीय पोलिस अधिकारी रतीश कुलकी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.