
अकोला : “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत अकोट फाईल पोलिसांनी महेबुबनगर, नायगाव येथील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शनिवारी रात्री कारवाई केली. या कारवाईत १२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी सात मोबाईल फोन आणि रोख रक्कम मिळून १ लाख ४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली. अटक केलेल्या आरोपींची नावे फिरोज कालु पप्पुवाले, सैयद सिकंदर सैयद कुरशीद, आफताब लाल मुन्नीवाले, सोहेल महेबुब गोरवे, मोहम्मद शब्बीर मोहम्मद नईम, शेख नदीम शेख नजीर, शाहरूख युसूफ कामनवाले, चांद छोटु चौधरी, शेख शमशेर शेख मेहबुब, शेख मजहर शेख शौकत, विशाल गजानन वाघमारे व शेख फैजल शेख नासीर अशी आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलिस अधीक्षक बदेली रेडडी आणि उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेख रहीम व त्यांच्या पथकाने केली.
“ऑपरेशन प्रहार” अंतर्गत अवैध दारू विक्री, जुगार अड्डे, तडीपार गुन्हेगार व फरार आरोपींविरुद्ध मोहीम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.