
स्थानिक: अकोला येथील
मा. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अकोला जिल्हयातुन मिसीग झालेल्या महीला व पुरुष यांचा शोध घेणे करीता तसेच अपहत मुली यांचा शोध घेणे करीता दिनांक १५ जून २०२३ ते ३० जून २०२३ पावेतो ऑपरेशन मुस्कान पथक या विशेष मोहीमचे आयोजन करून जिल्हयातील सन २०१५ ते ३० जुन २०२३ पर्यन्त मिसींग महीला, पुरुष व अपहृत मुली यांचा शोध घेणे करीता वेगवेगळे पथक तयार करून त्या पथकाद्वारे एकुण १४२ मिसींग व्यक्तींचा शोध लावला त्यापैकी ९२ महीला, ४७ पुरुष व ०३ अपहृत मुली यांचा शोध घेवुन त्यांना त्यांचे कुटुंबाचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक सा. , संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. संतोष महल्ले, स्यागुशा, अकोला, म.पो. हवा. अनिता टेकाम व पोलीस स्टेशनचे महीला व पुरुष अमलदार यांनी केली आहे.

