रामप्रकाश बन्सलोचन मिश्रा वय ५५ वर्ष रा. माधव नगर, गौरक्षण रोड अकोला. यांनी पोलीस स्टेशन खदान अकोला येथे रिपोर्ट दिला की, ते नागपुर येथून अकोला त्याचे राहते घरी रात्री १०:०० वा सुमारास परत आल्यानंतर ते त्यांचे कार्यालय समोर वाहनातुन उतरत असतांना अज्ञात दोन ईसमांनी त्यांचेवर मोटार साययकल वर येवून धारदार चाकुने जिवानीशी ठार मारण्याचे उद्देशाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून आरोपी हे घटनास्थळावरून पळून गेले. अश्या फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो. स्टे खदान अकोला येथे अपराध नं ६२८/२४ कलम १०९,३ (५) भा. न्या. सं प्रमाणे गुन्हा नोंद असून तपासावर आहे.
सदर गुन्हयात आरोपी अज्ञात असल्याने मा. पोलीस अधीक्षक साहेब अकोला श्री. बच्चन सिंह यांनी पो.नि शंकर शेळके स्थानीक गुन्हे शाखा अकोला यांना सदर गुन्हा उघडकीस आणन्या बाबत सुचना दिल्या, त्या अनुषंगाने पो.नि श्री. शंकर शेळके यांनी सपोनि. विजय चव्हाण, पोउपनि गोपाल जाधव यांचे नेतृत्वात स्थानीक गुन्हे शाखेचे पथक गठीत करून पथकाला गुन्हा उघडकीस आणण्या बाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्यात. वरून तपासक पथकातील अधिकरी आणि अमंलदार यांनी घटनेचे वेळी उपलब्ध असलेले सी.सी.टी. व्ही फुटेज तसेच तांत्रिक बाबींचा व गोपनीय बातमीदार यांचा वापर करून, गुन्ह्याचा तपास करूण त्यामध्ये जखमी नामे रामप्रकाश मिश्रा यांचे वर हल्ला करणारा ईसम नामे पवन विठठल कुंभलकर वय ३१ वर्ष रा. श्रीकृष्ण भगवान चौक वार्ड क २ कनान जि. नागपूर यांने त्याचे साथीदार यांचे सह गुन्हा केल्याचे निष्पन्न करूण आरोपी नामे पवन विठ्ठल कुंभलकर, वय ३१ वर्ष रा. श्रीकृष्ण भगवान चौक वार्ड क २ कनान जि. नागपूर याचा पाठलाग तसेच सापळा रचुन त्यास ताब्यात घेवून सदर गुन्हया बाबत विचापूस केली असता त्याने त्याचा सोबती सह गुन्हा केल्याचे कबुली देवून गुन्हयात वापरलेली एक काळ्या रंगाजी बजाज पल्सर गाडी विना नंबर ची ताब्यात घेतली. असुन आरोपीस मुद्देमालासह पोलीस स्टेशन खदान येथे पुढील तपास कामी देण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक अकोला श्री. बच्चन सिंह साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे साहेब, पो.नि श्री. शंकर शेळके स्थागुशा अकोला, यांचे मार्गदर्शनात सपोनि. श्री. विजय चव्हाण, पोउपनि, गोपाल जाधव, आशिष शिंदे, पो. अमंलदार दशरथ बोरकर, अब्दुल माजीद रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, वसीमोद्दीन शेख, अविनाश पाचपोर, फिरोज खान, उमेश पराये, खुशाल नेमाडे, गोकूल चव्हाण, सुलतान पठाण, भास्कर धोत्रे, आकश मानकर, धिरज वानखडे, अभिषेक पाठक, मोहम्मंद आमीर, शेख अन्सार, लिलाधर खंडारे, भिमराव दिपके, सतिष पवार, अशोक सोनोने, राहुल गायकवाड, तसेच चालक प्रशांत कमलाकर, अक्षय बोबडे, सायबर पो. स्टे चे आशिष आमले, गोपाल ठोंबरे यांनी केली आहे.