स्थानिक:अकोला
मोमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेल्फेअर ही सामाजिक संघटना मागील सतरा वर्षापासून गरीब रेशन कार्डधारक जनतेच्या अन्नसुरक्षेच्या प्रश्नावर महाराष्ट्रभर कार्यरत आहे. तसेच जनतेच्या प्रश्नावर जनहित याची काही दाखल केल्या आहेत देशात अन्न सुरक्षा विधेयक 2013 लागू आहे महाराष्ट्रातील सात कोटी 16 लाख जनतेला रेशन मिळण्याचा कायदेशीर अधिकार मिळालेला आहे. सदर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासन सतत परिपत्रके काढून प्रशासनाला सूचना आदेश देत असते परंतु महाराष्ट्रात 1999 पासून वार्षिक 15 हजार उत्पन्न मर्यादा ही दारिद्र्यरेषेची अशास्त्रीय व्याख्या अद्यापही लागू आहे तसेच अन्न सुरक्षेचा लाभ मिळण्यासाठी 2013 मध्ये ठेवण्यात आलेले ग्रामीण वार्षिक 44 हजाराच्या आत व शहरी 59 हजाराच्या आत उत्पन्न असलेली उत्पन्न मर्यादा ही वाढत्या महागाई समोर चुकीचे आहे याचा फायदा घेऊन दुकानदार कार्डधारकांना धमकावीत आहेत त्यामुळे कोणीही कार्डधारक तक्रार करायला पुढे येत नाही तसेच भ्रष्ट अधिकारी यांच्याबरोबर संगणमत करून काही ठिकाणी तक्रारदार कार्डधारकांची रेशन बंद करण्यात येते शिवाय इतरही अनेक समस्यांना कार्डधारकांना सातत्याने सामोरे जावे लागत आहे. शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही त्यामुळे रेशनच्या प्रश्नावरील खालील नमूद मागण्यासाठी धरणे दिनांक १५/११/२०२२ रोजी जिल्हा अधिकारी कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. कार्डधारकाच्या मागण्या पुढील प्रमाणे
1 – अन्नसुरक्षा कायदा 2013 अंतर्गत मिळणारे धान्य व प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मिळणारे मोफत धान्य ई पॉस मशीन मधून मिळणारी पावती कार्डधारकांना मिळाली पाहिजे. या आदेशाची अंमलबजावणी झालीच पाहिजे अन्यथा दोषी दुकानदारावर तातडीने कारवाईचे आदेश देण्यात यावेत.
2 – सर्व पात्र लाभार्थ्यांना यांच्या रेशन कार्ड वर पात्रतेचे शिक्के व बारा अंकी आरसी नंबर लिहिण्याची मोहीम राबविण्यात यावी.
3- रेशन दुकानावर दुकानाचे वेळापत्रक सुट्टीचा दिवस व तक्रार कुठे करावी याबाबतचा बॅनर लावण्यात यावा.
4 – किमान 250 कार्डधारकांना दुकानात धान्य आल्याची माहिती / सूचना एस एम एस द्वारे देण्याच्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी.
5 प्रत्येक महिन्यात रेशन दुकानावर अन्न दिवस साजरा करण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी.
6 अकोला / पुरवठा कार्यालयात नागरिकांची सनद म्हणजे कार्यालयात मिळणाऱ्या सेवा त्यासाठी लागणारा संबंधित जबाबदार व्यक्तीचे व काम न झाल्यास तक्रार कुठे करावी याची माहिती फलक लावण्यात यावे.
7- अकोलाच्या सर्व सेतु केंद्रावर शिधा पत्रीका विषयी लोकांची लुटमार करीत आहे नियामा प्रमाणे सहकार्य करीत नाही. करीता साहेबांनी या विषयी लक्ष देवुन कारवाई करावी.या मागण्या बाबत तातडीने कार्यवाही करावी. अशी जनतेच्या माध्यामातुन मागणी करण्यात आली.