महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त श्री शिवाजी महाविद्यालय मराठी विभागाच्या वतीने कार्यक्रम संपन्न…

“महात्मा फुले यांच्या कार्याला कृतीतून अवलंबणे म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन करणे होय.”

स्थानिक: अकोला येथील श्री शिवाजी महाविद्यालय महात्मा फुले पुण्यतिथी मराठी विभागाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मानव्य विद्या शाखेचे प्रमुख डॉ. विवेक हिवरे प्रमुख पाहुणे म्हणून मा.महादेवराव भुईभार, माजी उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे होते प्रमुख वक्ते म्हणून मराठी विभागाच्या डॉ.श्रद्धा थोरात तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. नाना वानखडे इतिहास विभाग प्रमुख हे होते. महादेवराव भूईभार साहेब आपल्या भाषणात म्हणाले “महात्मा फुले यांच्या कार्याला कृतीतून अवलंबणे म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन करणे होय.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय पोहरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक गणेश मेनकार यांनी केले आभार प्रदर्शन कु. मयुरी वाहने हिने केले कार्यक्रमासाठी डॉ. नीलिमा तिडके, डॉ.रावसाहेब काळे, डॉ.साधना कुलट,अनिल शेगावकर प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आशिष भोवते,समीना खान ,वैभवी गवई, प्रसाद शुभम वानखडे, किशोर गावंडे, शेजल आठवले, आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.