कालकथीत भारत मेश्राम यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना लुगडे वाटप..

सूर्योदय बालगृहात केले भोजनदान..

स्थानिक : अकोला येथील भवानीपेठ,तारफैल मधील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भारत मेश्राम यांचे 4 एप्रिल 2023 रोजी दुःखद निधन झाले होते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम येथे गरजू महिलांना भोजनदान आणि लुगडे, साड्या तर पुरुषांना कपडे वाटप करण्यात आले. तसेच सूर्योदय बालगृह कौलखेड येथे देखील भोजनदान देवून वाढदिवस साजरा करण्यात आला. समाजात जगत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो या वृत्तीने समाजसेवक भारत मेश्राम यांनी सातत्याने आपले योगदान दिले आहे. पण त्यांच्या जाण्याने समाजात एक न भरून निघणारी पोकळ निर्माण झाली. म्हणून त्यांच्या वाढदिवशी त्यांचे कार्य पुढे नेण्याचे काम वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष व ऑल इंडिया संपादक संघ जिल्हाध्यक्ष महेंद्र डोंगरे करीत आहे. भारत मेश्राम त्यांचे जावई असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी घडलो अशी भावना ते नेहमी व्यक्त करीत असतात. त्यांच्या पाऊलांवर पाऊल टाकण्याचे काम मेश्राम आणि डोंगरे परिवार करीत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून मातोश्री वृद्धाश्रम आणि सूर्योदय बालगृह येथे गरजूंना कपडे वाटप व भोजन दान करून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भारत मेश्राम यांना वंदन करण्यात आले. तेव्हा वनिताताई मेश्राम, निशा मेश्राम,रेवती मेश्राम, आशिष मेश्राम,भाऊराव मेश्राम, संगीता मेश्राम,महेंद्र डोंगरे, समाज कल्याण निरीक्षक खुरेंद्र तिडके,समाजसेवक राहुल मस्के, शुभम तिडके, अनिरुद्ध वानखडे, अमोल डोंगरे,निखिल डोंगरे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.