संग्रामपूर तालुक्यातील भोन या गावी सम्राट अशोक कालीन प्राचीन बुद्ध स्तुप संशोधनात सापडलेला आहे. हा स्तुप तथागत बुद्धांच्या पवित्र अस्थी वर बांधण्यात आला होता. या ठिकाणी मौर्य कालीन प्राचिन अवशेष देखिल मोठया प्रमाणात सापडलेले आहेत या पवित्र स्थळास अभिवादन करण्यासाठी २३ मे २०२४ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत बुध्द जयंती निमित्त बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क व राष्ट्रीय पिछड़ा (ओबीसी) वर्ग मोर्चा या सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रताप दादा पाटील प्रदेश अध्यक्ष मौर्य क्रांती संघ महाराष्ट्र राज्य हे करणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या संध्या हिवाळे मॅडम ह्या राहणार आहेत तसेच बहुजन समाजातील विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. करिता बौद्ध उपासक-उपासीका तथा बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बहुजन मुक्त्ति पार्टीचे युवा प्रदेश महासचिव सुजित बांगर यांनी केले आहे.