जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला मित्र मंडळ यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त केले अभिवादन..!

स्थानिक: अकोला येथे जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला मित्र मंडळ यांच्या वतीने जिल्हा स्त्री रुग्णालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञानाच्या अथांग सागराला या ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित स्त्री रुग्णालय येथील डॉ. जयंत पाटील,विभाग प्रमुख डॉ. आप्पासाहेब डांबरे,प्रमोद डेंगे, डॉ. पटोकार, डॉ.मनीष ठाकरे, ज्योती गवळी मॅडम, दिपाली हातोले, निरुमा बी शेख कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते व मुख्य संपादक (वंचितांचा प्रकाश) महेंद्र डोंगरे, सम्राट अशोक सेनेचे आकाश दादा शिरसाट, छगन खंडारे, बुद्ध रत्न इंगोले, राहुल इंगळे, सिद्धू मेश्राम,बिट्टू शिरसाट, मारुती वासनिक, रवि सरदार, ऍड.निखाडे साहेब व अनेक भीमसैनिक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा मुख्य आयोजन रुग्णसेवक सुरेश खंडारे रुग्णसेवक शेरू इंगळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.