स्थानिक: अकोला येथील संतकबीर नगर, अकोट फैल, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड स्वप्नील बसवंत
वानखडे, वय २८ वर्षे, याचे वर यापूर्वी दंगा करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करणे, शिवीगाळ करणे, दुखापत करणे, बाल लैंगिक अत्याचार करणे, विनयभंग असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापूर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही तसेच एमपीडीए अन्वये ०१ वर्ष स्थानबध्दतेची कारवाई करून सुध्दा तो कुठल्याही कारवाईस जुमानत नसल्याने त्याचे विरुध्द गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात गुंड स्वप्नील बसवंत वानखडे, याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, नीमा अरोरा यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवून सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्धा करीता अकोला जिल्हा कारागृहात
कुख्यात गुंडाविरुध्द एमपीडीए कायदयाअंर्तगत स्थानबध्द आदेश पारीत केले. मा. जिल्हादंडाधिकारी, सा. अकोला यांचे आदेशावरून स्वप्नील बसवंत वानखडे, यास सदरचा आदेश तामील करून त्यास दिनांक १९/०६/२०२३ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले.
सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, संदिप घुगे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, अभय डोंगरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अकोला, सुभाष दुधगांवकर स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, पोहेकॉ मंगेश महल्ले, यांनी तसेच पो.स्टे. अकोट फैल येथील पोलीस निरीक्षक महेंद्र कदम तसेच पो.स्टे. तील पो. कॉ. प्रवेश काळे व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांची माहीती संकलीत करण्यात आली असुन त्यांचे विरुध्द मोटया प्रमाणात एम. पी. डी. ए. अॅक्ट खाली कार्यवाही प्रस्तावित आहे.