१९ गुन्हे दाखल असलेला कुख्यात चैन स्नॅचर याला सातारा जिल्हयातून अकोला स्थानिक गुन्हे शाखेने केले अटक

गेल्या १५ दिवसातील अकोला शहरातील ०३ चैन स्नॅचींग (सोभ साखळी हिसकावने) गुन्हे उघडकिस

दिनांक १९/०८/२०२३ रोजी शास्त्री नगर, सिव्हील लाईन अकोला येथे महिलेचे सोन साखळी हिसकवुन ०२ अज्ञात दुचाकी वरून फरार झाले होते त्याबाबत पो.स्टे. सिव्हील लाईन येथे अप क. ४२९/२०२४ कलम ३०९ (४), ३(५) भा. न्या. सं. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दिनांक २२/०८/२०२४ रोजी पो.स्टे. सिव्हील लाईन उमरी परिसरात ०२ अज्ञात दुचाकी स्वारांनी एका महिलेच्या गळयातील सोन साखळी हिसकावुन फरार झाले होते. लगेच १ तासाचे अंतराने मानव शोरूम समोर पो.स्टे. जुने शहर हद्दीत त्याच ०२ अज्ञान दुचाकी स्वारांनी महिलेच्या गळयातील सोन साखळी हिसकावुन वाशिम बायपास च्या दिशेने

फरार झाले होते. त्याबाबत पो.स्टे. सिव्हील लाईन येथे अप क. ४३७/२०२४ कलम ३०९ (४), ३(५) भा.व्या.सं. व पो.

स्टे. जुने शहर येथे अप क. ४६४/२०२४ कलम ३०४ (२), ३(५) भा.न्या.सं. प्रमाणे एकाच दिवशी दाखल करण्यात आले.

दिनांक २२/०८/२०२४ रोजी काळा मारोती मंदीर जवळ, राम नगर अकोला येथे एका वृध्द महिलेची सोन साखळी दोन इसमांनी हिसकावुन घेतल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी स्था.गु.शा. प्रमुख पो.नि. शंकर शेळके यांना माहिती दिली असता त्यांनी स्था.गु.शा. अकोला येथील अधिकारी व पथकासह तात्काळ घटनास्थळी भेट देवुन पिडीत वृध्द महिलेच्या घरी भेट दुवन गुन्हयाबाबत माहिती घेवुन सि.सि.टी. व्ही. फुटेज प्राप्त करून तपासाला गती दिली होती.

राज्य स्तरावरील गोपनिय माहितीगार व तांत्रीक माहितीचा आधारे आरोपी नामे सादिक अली इबाबत अली इराणी, क्य २० वर्ष, रा. पापा नगर, रजा टॉवर जवळ, भुसावळ, जि. जळगाव हा लोणंद ता. खंडाळा जि. सातारा येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्याने दिनांक २४/०८/२०२४ रोजी तात्काळ मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह सा. यांचे आदेशाने स्था.गु.शा. अकोला चे एक पथक आरोपीस अटक करण्यासाठी सातारा येथे खाना झाले होते.

दिनांक २५/०८/२०२४ रोजी स्था.गु.शा. अकोला पथकाने लोणंद ता. खंडाळा जि. सातारा येथे पोहचुन तांत्रीक माहिती व स्थानिक खबरीच्या मदतीने आरोपी भाडयाने राहत असलेल्या फलटण रोड, लोणंद येथील घरून शिताफिने ताब्यात घेवुन अटक केले. व त्याचा साथीदार हा मोटर सायकल सह फरार असुन त्यास लवकरच त्यास अटक करण्यात येते.

आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभुमी तपासली असता त्याचेवर एकंदर गंभीर स्वरूपाचे (चैन स्नॅचींग) भुसावळ जि. जळगाव येथे एकुण ०६ गुन्हे, जळगाव शहर येथे ०२ गुन्हे, हर्सल मध्यप्रदेश, वाकड पिंपरी चिंचवड, जामनेर जि. जळगाव, रत्नागिरी, कोथरूड जि. पुणे, खामगाव जि. बुलढाणा, पंतनगर मुबंई, कोतवाली अहमदनगर येथे प्रत्येकी ०१ गुन्हा असे एकुण १९ गुन्हे दाखल असुन अकोला जिल्हयात ०३ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपी कडुन आणखी गुन्हे उघडकिस

येण्याची शक्यता आहे. पुढील कार्यवाहीसाठी सदर आरोपीस पो.स्टे. सिव्हील लाईन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह सा, जि. अकोला, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा, जि अकोला, यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. शंकर शेळके सा. स्थानिक गुन्हे शाखा अकोला व स्था.गु.शा. येथील स.पो.नि. विजय चव्हाण, पो.उप.नि. गोपाल जाधव, पो. अमंलदार रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, व्यसिमोद्दीन, भिमराव दिपके, प्रशांत कमलाकर, राहुल गायकवाड, सायबर शाखेचे पो.अं. गोपाल ठोंबरे, आशिष आमले यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.