नोटरी धारकांची गोरखधंदा थांबवा – महेंद्र भोजने

अकोला प्रती – अकोला शहर व जिल्हयातील शासनामार्फत नियुक्त केलेल्या नोटरी धारकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे दस्तऐवज छायांकित करणे, लहान-मोठे करार करणे, छायांकित प्रतीसाठी नोटरी आवश्यक असते. त्याकरिता सर्वसामान्य जनतेकडून नोटरी धारकांव्दारे रितसर पावती न देता आर्थिक लूट करण्याचे काम अकोला शहर व जिल्हयातील नोटरी धारक करीत आहेत.

तरी आपणास विनंती की, नोटरी धारकांनी चालविलेली सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट थांबवावी तसेच नोटरीधारकांनी शासनाने मंजुर केलेल्या कार्यक्षेत्रात काम करावे व नोटरी धारकांनी नोटरीच्या फि बाबत त्यांच्या कार्यालयामध्ये फि संबंधी ठळक अक्षरात आकारण्यात येणा-या फि चा उल्लेख करावा असे आदेश असतांनासुध्दा सदर नोटरीधारक हे त्यांनी नेमलेल्या कार्यक्षेत्राबाहेर काम करीत आहेत ही अतिशय गंभीर बाब आहे तसेच यामुळे शासनाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे. तरी महोदय, हा नोटरी धारकांकडून चालविण्यात येणारा गैरप्रकार त्वरित थांबवावा व सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक लूट/फसवणूक बंद करावी ही विनंती.अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी फुले आंचेडकरी राष्ट्रीय विद्यार्थी युवक संघटना संस्थापक जिल्हाध्यक्ष
महेंद्र भाऊ भोजने, यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे भिमकीरण दामोदर, श्रीकांत खेंडकर, उल्हास सरदार, संतोष दामोदर ईत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.