
स्थानिक:- अकोला नवथळ – खेकडी – परितवाडा गट ग्रा.पं. येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रा.पं. निवडणूकीत संपुर्ण नागराज परीवर्तन पॅनेलचा विजय झाला व पॅनल प्रमुख राहूल तेलगोटे हे थेट सरपंच पदी निवडून आले आहेत. आज दि:-०९/०१/२०२३ रोजी सरपंच राहूल तेलगोटे व उपसरपंच सौ. मिरा सुरेश गोराळे यांचा पदग्रहण सोहळा नवथळ येथे पार पडला.
यावेळी ग्रा.पं. सदस्य प्रकाश गोपणारायान ,अनिता तेलगोटे, प्रीती तेलगोटे, सुवर्णा तेलगोटे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे , राजेंद्र उर्फ नागराज तेलगोटे, रमेश फुकट, पिंटू महाराज, अमोल तेलगोटे, बाळू ढगे, प्रमोद वावरे, किशोर तेलगोटे, देवलाल तेलगोटे , भगवान तेलगोटे, विश्वंभर तेलगोटे विवेकानंद तेलगोटे, महानंदन तेलगोटे, दामोदर तेलगोटे,राजेश तेलगोटे, सुधाकर तेलगोटे, श्रीकांत तेलगोटे, सूरज तेलगोटे यांच्या सह नवथळ, खेकडी, परितवाडा गावातील ज्येष्ठ व युवा मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.