बार्शिटाकळी येथील NDPS ॲट दाखल गुन्हयातील आठव्या आरोपीस शेगाव येथुन अटक

स्थानिक गुन्हे शाखा अकोला ने दिनांक २४/१२/२०२४ रोजी पो.स्टे. बार्शिटाकळी अकोला हद्दीत गुप्त बातमीदाराच्या बातमी वरून NDPS अॅक्ट अन्वये कारवाई करून यातील मुख्य आरोपी नामे आदिल मोहम्मद शमीम अन्सार वय ३६ वर्ष रा. वसई मुबई अधिक ०३ आरोपीन जवळुन एकुण ५ किलो ५४८ ग्रॅम अमली पदार्थ कि.अं. १,३८,७०,०००/ रू चा व ईतर साहित्य असा एकुण २, ३८,७०,०००/ रू चा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेवुन पो.स्टे. बार्शिटाकळी अकोला येथे अप क. ५३२/२०२४ कलम २२ (सी), ८ (सी), २५, २९ NDPS अॅक्ट अन्चये दाखल करण्यात आला होता. व पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील अधिकारी करित असुन घटनास्थळावरून ०५ आरोपीतांना अटक करण्यात केले होते ते पाचही आरोपी अदयाप पावेतो न्यायालयीन कोठडीत अकोला कारागृहात आहेत.

सदर गुन्हयातील जप्त अंमलीपदार्थ रासायनिक विश्लेषणासाठी मा. न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळा अमरावती येथे दाखल केला असता तो अंमलीपदार्थ हे मेफेड्रॉन ड्रग (MD) असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे.

आज दिनांक ०४/०१/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोला चे पोलीस निरिक्षक श्री. शंकर शेळके यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि, नमुद गुन्हयातील फरार आरोपी नामे इमरान खान असलम खान वय ४२ वर्ष, रा. सुरत हा शेगाव येथे येत असल्याची माहिती मिळाल्यावरून पो. नि. शंकर शेळके हे पथकासह रवाना होवुन वर नमुद आरोपीस शेगाव येथुन ताब्यात घेवुन त्यास अटक करण्यात आली असुन त्याचे कडुन अधिक तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह सा, मा. अपर पोलीस अधिक्षक, अभय डोंगरे सा, यांचे मार्गदर्शना खाली पो.नि. शंकर शेळके, स.पो.नि. विजय चव्हाण, पोउपनि, गोपाल जाधव, पो.उप.नि. माजीद पठाण स्थानिक गुन्हे शाखा, अकोला तसेच स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस अमंलदार सुलतान पठाण, खुशाल नेमाडे, वसिमोद्दीन, प्रविण कश्यप, स्वप्निल खेडकर, धिरज वानखडे, स्वप्निल चौधरी, मोहम्मद आमीर यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published.