
अकोला :- आक्रमण युवक संघटनेच्या वतीने आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आले की, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत पात्र आशा स्वयंसेविकांची जानेवारी मध्ये लिस्ट लावण्यात आली व त्यांना 20/01/2025 ते 27/01/2025 पर्यंत या कालावधीत नियुक्ती देण्यात येणार होती. पण दिलेला कालावधी निघुन गेला तरी आशा स्वयंसेविकांना संपर्क करण्यात आला नाही. कार्यालयात विचारणा केली असता, 31 जानेवारी पर्यंत कॉल येतील असे सांगण्यात आले पण आता पर्यंत कोणाला हि कॉल आलेला नाही. आपण पात्र झालो आहे म्हणुन पात्र उमेदवारानी आपला चालु जॉब सोडून दिला त्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांनां तोंड देण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे ज्या नागरी आरोग्य केंद्रावरील तक्रारी आले नसतील त्या आरोग्य केंद्रावर स्वयंसेविकांना देण्यात यावी. तक्रारी आलेल्या केंद्रावरील लवकर सुनावणी करुन निकाल लावून नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली व 3 ते 4 दिवसात पात्र उमेदवारांना जॉईन करुन घेतले जाईल असे वैद्यकीय अधिक्षक यांनी सांगितले.निवेदन देण्यासाठी जिल्हा अध्यक्ष सुरज मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद इंगळे, चेतन डोंगरे,विनोद इंगळे,शितल डोंगरे,शालिनी रायमल,रुक्मिणी डाबेराव,कीर्ती मेश्राम, कविता इंगळे, सोनाली डोंगरे,वंदना राखोंडे, हुमिरा परवीन,कंचन सदार,इतर पात्र उमेदवार उपस्थित होत़े.