राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थी घडवण्याची चळवळ- प्राचार्य डॉ. अंबादास कुलट

दि .२९/११/२०२२स्थानिक: अकोला

श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व वाणिज्य मित्रमंडळ च्या वतीने प्रमाणपत्र वितरण व सेवानिवृत्त समारंभ संपन्न. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट सत्कारमूर्ती वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अनिल राऊत गणित विभाग प्रमुख डॉ.अनिल मेटकर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आय क्यू एस सी समन्वयक डॉ.आशिष राऊत डॉ.विवेक हिवरे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.गणेश खेकाळे,सचिन भुतेकर प्रा.कपिला म्हैसणे कांचन कुंभलकर उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये ज्या स्वयंसेवकाचे दोन वर्षे पूर्ण झालेले आहे व त्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्व विकास व समाजसेवा केली अशा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच डॉ. अनिल राऊत व डॉ.अनिल मेतकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने त्यांचासुद्धा सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाला माजी विद्यार्थी अक्षय राऊत ,अंकुश इंगळे, दिपाली दांदळे,प्रतीक दुतोंडे,विशाल भोजने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी प्रतिनिधी रोहन बुंदेले यांनी केले संचालन प्रज्वल ईसाळ तर आभार प्रदर्शन घडसन यांनी केले कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे गटप्रमुख वैष्णवी आसेकर, सतीश अस्वार, अक्षय वानखडे, साक्षी घाटोळे, साक्षी कोकाटे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी व वाणिज्य मित्र परिवारांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.