श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

अकोला: स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागात दि. २८ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला सदरहु राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम दोन सत्रात घेण्यात आला. सकाळच्या सत्रात भारतीय विज्ञान व तंत्रविज्ञान विभागाने यावर्षीसाठी जाहीर केलेती थीम “Global Science for Global Wellbeing” नुसार भौतिकशास्त्र विभागात महाविद्यालयीन स्तरावर Quiz competition आणि Poster Competition या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तर दुपारच्या सत्रामध्ये स्पर्धेतील गुणवंताचे सत्कार व मान्यवरांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय विज्ञानदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सर सी. व्ही. रमण आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दिप प्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास एल. कुलट होते तर पोस्टर प्रदर्शनीचे उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. रविन्द्र भास्कर तसेच विज्ञान विद्याशाखा प्रमुख डॉ. संजय शेंडे, आणि भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. बी. सावरकर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी “Quiz competition” स्पर्धेत प्रथम क्रमांक पदव्युत्तर संवर्गातून कु चंचल शाईवाले आणि पदवी संवर्गातून ओजस राऊत व फुरकान खान तर “Poster Competition स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेती चमु बी.एस्सी. भाग २ च्या विद्यार्थीनी कु. वैष्णवी पठारे, कु. ऋशाली धोत्रे, कु. राजेश्वरी वचारकर तसेच द्वितीय क्रमांक विजेती चमु बी.एस्सी. भाग २ घी कु. नयना परसया आणि तृतीय क्रमांक विजेती चमु एमएस्सी भाग २ च्या विद्यार्थीनी कु. चंचल शाईवाले व श्वेता शाईवाले तसेच प्रथम उत्तेजनार्थ विजेती चमु बी. एस्सी भाग २ च्या विद्यार्थीनी कु. मदीहा मेहवाश कु. पायल शर्मा, कु.कींजल माहुरे व द्वितीय उत्तेजनार्थ विजेती चमु एम. एस्सी भाग २ च्या विद्यार्थीनी कुं. सलमा कौसर, कु.रुतुजा अंबाडकर, कु.कल्याणी फोकमारे इत्यादींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंबादास एल. कुलट यांनी स्पर्धांमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून समाज हितासाठी विज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रमुख अतिथी डॉ रविन्द्र भास्कर यांनी सर सी. व्हि. रमण यांच्या संशोधनाला उजाळा देत समाज उपयोगी संशोधनाची गरज, तसेच पेटंटचा उपलब्ध असलेला पर्याय आणि त्याचे फायदे यावर विद्यार्थ्यांना विस्तृतपणे मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयातील विज्ञान विद्याशाखा प्रमुख डॉ संजय शेंडे यांनी विजेत्या चमूचे अभिनंदन करून विज्ञानाचा प्रचार व प्रसार समाज हितासाठी कसा लाभदायक होवू शकतो यांचे महत्व विशद केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. बी. सावरकर यांनी केले. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आयोजित “Poster Competition” स्पर्धेसाठी प्रा. डॉ. एस. एम. पल्हाडे, डॉ. एस. एन. झोडपे व प्रा. आर. एस. काळे तर “Quiz Competition” या स्पर्धेकरिता डॉ. व्ही जी ठाकरे, डॉ. पी. जे. ठाकरे व डॉ. एम. आर. बेलखेडकर यांनी परीक्षक म्हणून कार्य केले तर राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमाचे सुत्र संचालन एमएस्सी भौतिकशास्त्राची विद्यार्थीनी कु. ईशा मुदगल व कु. निकीता वराडे आणि आभार प्रदर्शन कु. फाल्गुनी देवकर यांनी केले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित दोन्ही स्पर्धेला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता डॉ. व्ही. जी. ठाकरे, डॉ. पी. जे. ठाकरे, डॉ. जे.व्ही. भाले, डॉ. एस. एम. पल्हाडे, डॉ. एम. आर. बेलखेडकर, प्रा. कु प्रियंका कुंडलवाल, प्रा.कु. वैष्णवी निलखन, प्रा गोविंद फेदरे, प्रा. प्रशांत पावसाळे आदी शिक्षक तसेच श्री गवळी, श्री भाकरे, श्री शेळके आदी शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.