
- शेवटी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेद्वारा आक्रमक पवित्रा घेत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन –
प्रतिनिधी/
अकोला शहरातील कौलखेड खडकी परिसरात नारायणी इंटरनॅशनल पब्लिक स्कुल नावाने एक नवीन खाजगी शाळा सुरू झाली असून सदर शाळेला कुठल्याही प्रकारची मान्यता नसताना सुद्धा अवैधरित्या सदर शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणल्यामुळे व यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा चालू असून सुद्धा अद्याप पर्यंत कुठलीच कारवाई झाली नसल्यामुळे रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला जिल्हा अध्यक्ष तथा विदर्भ सरचिटणीस आकाश हिवराळे यांनी दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढा लढण्याचा निर्धार केला असून महानगरपालिका विभागाला सुद्धा सदर बांधकाम अनधिकृत असून त्या ठिकाणी पाण्यामुळे नैसर्गिक आपत्ती येऊन विद्यार्थ्यांचे जीवितास धोका आहे .त्यामुळे तात्काळ उचित कार्यवाही करून फौजदारी कारवाई करण्यात यावी .या मागणीचे निवेदन रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद द्वारा आकाश गुलाबराव हिवराळे जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ सरचिटणीस रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला, वैभव अवचार, उज्वला अवचार यांच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांना देण्यात आले.असून त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही न केल्यास सदर शाळेला टाळा ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.