दिवाळीची पहाट गरजू रुग्णांसोबत

स्थानिक अकोला:
महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना मध्यवर्ती सेना , रक्ताचं नातं ग्रुप, एम एस ई बी अभियंता सहकारी पतसंस्था मध्यवर्ती अकोला व सब अॉर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीची पहाट गरजू रुग्णांसोबत या उपक्रमांतर्गत अकोल्यातील नायगाव डम्पिंग ग्राउंड भागात निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटी व बालकल्याण विभाग अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करण्यात आले व त्यांना मोफत गोळ्या आणि औषधांचे वाटप करण्यात आले.
तेव्हा प्रा. संजय खडसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आरोग्याचे महत्त्व पटवून दिले आणि आरोग्य तपासणीनंतर मुलांना दिवाळीचा फराळ देखील वाटप करण्यात आला. लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हा लाख मोलाचा होता.
तेव्हा संघटनेचे पदाधिकारी, डॉक्टर,अधिकारी उपस्थित होते.
