
वंचित बहुजन युवा आघाडी ने आमदाराचा फोटो उलटा टाकून केले आंदोलन…
मुर्तिजापूर प्रतिनिधी मुर्तिजापूर-तालुक्यातील मुर्तिजापूर शेलु बोंडे मार्गे अकोला रोडवरील जितापुर येथील पुलभाजप चे आमदार हरीष पिंपळे यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आला होता त्या रस्त्याने पहिला पाऊस पडतो न पडतो रस्त्यावर खड्डे पडले आणि रेती व गिट्टी निघून रस्ता वाहुन गेला होता या घटनेचा वंचित बहुजन युवक आघाडीने आ पिंपळे यांचा फोटो उलटा करुन आंदोंलन केलेमुर्तिजापूर शेलु मार्गे अकोला रोडवरील जितापुर नाकट येथे गेल्या वर्षी आ हरिष पिंपळे यांच्या स्थानिक विकास निधीतून पुलाचे बांधकाम करण्यात आले होते जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुर वाहुन गेला सदरहू कामावर वंचित बहुजन युवक आघाडी ने आक्षेप घेवून आज आंदोलन केलेत्यामुळे या परिसरातील नागरिकांना शेतीची, दैनंदिन कामे करताना खूप त्रासाला सामोरे जावे लागत आहे.वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र दादा पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या विरोधात वंचित बहुजन युवा आघाडी मुर्तिजापूर तालुका च्या वतीने आमदार हरिष पिंपळे यांचा बॅनरवर उलटा फोटो टाकुन घोषणा देत निषेध नोंदवला..या रस्त्याची अवस्था अवघ्या ६ महिन्यात एवढी खराब होण्याचे कारण म्हणजे या रस्ता बांधकामात भ्रष्टाचार झाला आहे म्हणूनया रस्त्याच्या बांधकामात पैसे कोण कोण खाल् ले असा प्रश्न विचारत युवा आघाडी ने भ्रष्टाचारा विरोधात नारे देत आंदोलन केले.तात्काळ रस्त्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा आणि नवीन रस्ता बांधकाम करा अन्यथा तिव्र आंदोलन करू असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडी ने दीला.

यावेळी तालुका अध्यक्ष नितीन पावडे महासचिव मनोज तायडे तालुका उपाध्यक्ष विशाल इंगळे व तालुका उपाध्यक्ष रणजीत शिरसाटकिशोर डांगे उपाध्यक्ष तालुका सचिव महेंद्र तायडे रोहित अंभोरे आदर्श इंगळे शुद्धोधन भोसले सचिव सिद्धार्थ डोंगरे आकाश प्रभे राहुल कोल्हे अजिंक्य शिरसाट राहुल वानखडे चेतन शिरसाट नितीन वानखडे राहुल थोरात फुल वानखडे करण वानखडे अजय गावंडे संगपाल मोहोळ प्रशांत सोळंके राहुल वानखडे मयूर इंगळे अक्षय खांडेकर अक्षय इंगळे संमेक साउथ कर ऋतिक इंगळे शुभम साउथकर विजय इंगळे प्रफुल खांडेकर विशाल खांडेकर अजय खांडेकर असोजीत इंगळे तुषार जामनिक व समस्त वंचित बहुजन युवा आघाडी कार्यकर्ते मुर्तीजापुर तालुका उपस्थित होते.