
संस्कार वर्ग नायगाव च्या मुलांनी दिली उपजिल्हाधिकारी यांना अविस्मरणीय आठवण
स्थानिक: अकोला नायगाव येथे अनेक दिवसापासून सुरू असलेल्या संस्कार वर्गाच्या वतीने अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रा. संजय खडसे यांच्या संकल्पनेतून बालकल्याण विभाग व तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटी,अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने नायगाव येथे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकासाठी एक संस्कार वर्ग युवा वक्ते विशाल नंदागवळी यांच्या मार्फत चालवल्या जाते.
नायगाव हा भाग अकोल्यातील डंपिंग ग्राउंडला लागून आहे. बाजूला रहवासी असलेले परिवार हे गरीब असल्याने त्यांचे मुले ही परिस्तिथी नसल्याने शाळेत जाण्याऐवजी डंपिंग ग्राऊंडवर प्लास्टिक,लोखंड वेचून आपला उदरनिर्वाह करतात. पालक अशिक्षित असल्याने ते मुलांना शाळेत पाठवायला तयार नाही. अशा विपरीत परिस्थितीत त्याच ठिकाणी शिक्षणाची गोडी त्यांच्यात निर्माण व्हावी या उद्देशाने नायगाव भागात सिद्धार्थवाडी येथे संस्कार वर्ग उघडून रोज सायंकाळी अभ्यासाचे धडे देवून आणि प्रात्यक्षिके मधून कलागुणांना वाव दिल्या जाते. दिनांक ४ फेब्रुवारी हा दिवस अकोल्यातील निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांचा वाढदिवस त्या दिवशी आपण देखील काहीतरी करावे या भावनेने संस्कार वर्गातील मुलांनी आगळावेगळा वाढदिवस साजरा करायचे ठरवले.

सुरवातीला मुलांनी संस्कार वर्गाचा हॉल व आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. वर्गाला सजविण्यासाठी फुगे,रिबीन सोबत वेस्ट वस्तूपासून बेस्ट सजावट केली त्यात उत्कर्ष इंटरप्राजेस यांनी शैक्षणिक साहित्य देवून भर घातली. परिसरात जावून फुलांची झाडे शोधत हाताने पुष्पगुच्छ तयार केले. फुलांचा वर्षाव करण्यासाठी पृष्ठाच्या बॉक्सला वर बांधले. प्रा. संजय खडसे साहेब येताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला तेव्हा त्यांचे डोळे पाणावले होते. मुलांनी सोबत केक कापून एक आगळावेगळा वाढदिवस साजरा केला. तेव्हा सना खडसे हीने मनोगत व्यक्त केले. तर प्रा. संजय खडसे यांनी मुलांचे आभार व्यक्त करत मोलाचा संदेश दिला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र डोंगरे, शुभम वानखेडे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यश्वीतेसाठी गजानन महल्ले यांनी सहकार्य केले.