
श्रीमती आनंदीबाई मालोकार कृषि तंत्र विद्यालय निंबी मालोकार येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकमाची सुरूवात ओम महल्ले याने शिवगर्जनेने केली. विद्यालयातील विद्यार्थीनी व विद्यार्थी यांनी पोवाडे व भाषणाचे सादरीकरण केले. विद्यालयातील व्दितिय वर्षातील विद्यार्थी ओम महल्ले याने महाराजांच्या जीवनावर उत्कृष्ट व्याख्यान दिले. त्यामध्ये प्रामुख्याने बाल कलाकार मास्टर अर्णय निलेश भगत याने पोवाडा गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. निलेश भगत, श्री. गजानन सुरळकर व श्री नरेश शेंद्रे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश शिंदे यांनी तर आभारप्रदर्शन अनिकेत देंगे याने केले. कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी विजय खेळकर, वैभव सदांशिव, सौरभ इंगोले, विकांत तायडे, रोहन लांडे, निखिल आढे, अजय तेलमोरे, अनिकेत इंगळे, अजिंक्य इंगळे, कु गौरी गावंडे, कु. सारिका तायडे, कु. वृषाली तायडे, कु. टिना अवताळे, कु. रूपाली गावंडे, कु. अपूर्वा गवई, कु, कल्याणी लाखे यांनी परिश्रम घेतले.