फुले आंबेडकर विचार मंच सम्राट अशोक प्रतिष्ठान चे चंद्रकांत पाटील विरोधात आंदोलन.

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भिक मागून शाळा सुरू केल्या असे बेताल वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत फुले आंबेडकर विचार मंच,सम्राट अशोक ब्रिगेड,आंबेडकरी कार्यकर्ते यांच्या वतीने दही हांडा या ठिकाणी प्रा विजय आठवले यांचे नेतृत्वात तीव्र निदर्शने आंदोलन करून चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली याप्रसंगी ठाणेदार सुरेंद्र राऊत यांना निवेदन सादर करण्यात आले.

महाराष्ट्ची पुरोगामी ही ओळख फुले शाहू आंबेडकर यांच्या मुळे आहे आहे असे म्हटले आहे, महाराष्ट्राच्या जडणघडणीत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील पंजाब राव देशमुख अश्या महा पुरुषांचे प्रचंड योगदान असताना त्यांचा सत्तेतील महत्वाची खाती सांभाळणाऱ्या लोकप्रतिनिधींनी अपमान करावा ही बाब निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे . शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे साधन असते म्हणूनच या महापुरुषांनी शेकडो वर्षे शिक्षणा पासून वंचित समूहाला शिक्षण देण्यासाठी गावोगावी शाळा निर्माण केल्या, त्यांच्या या प्रागतिक कार्याला लोकांनी सुद्धा भरभरून सहकार्य केले.असल्याचे म्हटले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दर्जाची आणि संधीची समानता स्पष्ट केली आहे त्यानुसार शेकडो वर्ष शिक्षणापासून वंचित समूहाला दर्जेदार मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्याची शासन प्रशासनाची प्रमुख जबाबदारी आहे असे निवेदनात नमूद आहे.

दुर्देवाने शिक्षणाचे खाजगीकरण गोरगरिबांच्या वंचित समूहाला शिक्षणा पासून वंचित ठेवण्याचा डाव आहे .असा आरोप सुद्धा निवेदनातून करण्यात आला. शिक्षणासाठी अनुदान नाकारण्याची सरकारची मानसिकता शिक्षणाच्या जबाबदारीतून पळ काढणारी आहे असे सुद्धा म्हटले आहे , राष्ट्रउभारणीत शिक्षण हेच केंद्रस्थानी असताना शिक्षण अनुदान बाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी भीक मागितली अस वक्तव्य करून जबाबदार लोकप्रतिनिधी असून सुद्धा महापुरुषांच्या कार्याचा अपमान केला आहे दरम्यान त्यांच्या या विधानाने संतप्त झालेल्या समता दैनिक दल कार्यकर्त्यांनी त्यांचे वर शाई फेक करीत निषेध व्यक्त केला. पोलिसांनी गंभीर गुन्हे या आंदोलक कार्यकर्त्यावर दाखल केले ही बाब सत्तेची हुकूमशाही कडे वाटचाल सुरू असल्याचे दर्शविते असा आरोप निवेदनात करण्यात आला..

निवेदनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या प्रकाराची संखोल चौकशी करून कारवाई केली पाहिजे असे सुद्धा म्हटले आहे. फुले आंबेडकर विचार मंच सम्राट अशोक ब्रिगेड,आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांचे वतीने मागण्या करण्यात आल्या 1…ना.. चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांना बाबत केलेल्या बेताल वक्तव्य साठी जाहीर माफी मागावी…2… मनोज गरबडे व त्यांचे सहकारी यांचे वरील गंभीर गुन्हे मागे घेण्यात यावे..3.. विनाअनुदानित ,अंशतः अनुदानित शाळा उच्च माध्यमिक विद्यालय महाविद्यालये, यांना तत्काळ अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे ..इत्यादी मागण्या सुद्धा निवेदनातून करण्यात आल्या या संदर्भात न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आला आहे ..या निदर्शने आंदोलनात फुले आंबेडकर विचार मंच मार्गदर्शक व सम्राट अशोक प्रतिष्ठान अध्यक्ष प्रा.विजय आठवले यांचेसह पत्रकार कलाम चौधरी ,खालिद भाई मज्जिद भाई ,विनोद आठवले, राहुल आठवले, जिवक आठवले सिद्धार्थ शिरसाट,आश्र्वजित शिरसाट रोशन आठवले,नागसेन आठवले प्रथमेश वाहुर वाघ, धम्मा ढोकणे ,अमोल आठवले प्रकाश आठवले योगेश ढोकणे संजय शिरसाट दिलीप शिरसाट सुशील दामोदर सुरेंद्र आठवले धम्मा आठवले आशिष आठवले सतिश आठवले सागर आठवले इत्यादी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.