पो.स्टे रामदासपेठ अकोला येथील मोटार सायकल चोरी गुन्हा ०६ तासात उघड

आज दि. २३.०२.२०२४ रोजी फिर्यादी नामे राजु छटटु बहिरेवाले वय ४९ वर्ष व्यवसाय हमाली रा. मोहमदी मस्जीद जवळ, गवळीपुरा, अकोला यांनी पोलिस स्टेशनला येवुन रिपोर्ट दिला कि, सकाळी ०९.३० वा दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात त्याची बाजाज कंपणीची पल्सर १२५ सिसि काळया रंगाची जिचा क एम. एच.३० बीटी ६९८५ कि.अ. १,००,००० रूची घेवन ते चहा पिण्या करीता आले व चहा पिवुन ते त्यानी त्याची मोटार सायकल ठेवलेल्या ठिकाणी जावुन पाहीले असता तेथे त्यांची बाजाज कंपणीची पल्सर १२५ सिसि काळया रंगाची जिचा क एम.एच.३० बीटी ६९८५ कि.अ. १,००,००० रू दिसुन आली नाही ती कोनी अज्ञात चोराणे चोरून नेली अशा फिर्याद वरून सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला.

सदर गुन्हयाच्या तपासात मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या माहिती वरून तसेच सिसिटीव्ही फुटेज वरून पोस्टॉफने आरोपी अंकुश शंकरराव गांवडे वय २८ वर्ष रा. शिक्षक कॉलणी चोहट्टा बाझार ता. अकोट जि. अकोला यास ताब्यात घेवुन विवरणा केली असता त्याने सदरची मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली तसेच त्याच्या कडुन एक मोटारसायकल बाजाज कंपणीची पल्सर १२५ सिसि काळया रंगाची जिचा क एम.एच.३० बीटी ६९८५ कि.अ. १,००,००० रू ची चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे नमुद आरोपी यांस मा. न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आले.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंग सा., तसेच पोलिस उप अधीक्षक श्री. अभय डोगरे सा., उपविभागीय पोलिस अधीकारी श्री. सतिश कुळकर्णी सा शहर विभाग अकोला यांच्या मार्गदर्शनात पो.नी. मनोज बहुरे, पोहवा किशोर गवळी ब नं ३९४, पोहवा संतोष गवई ब नं ७६८, पोका आकाश जामोदे ब नं २२९८, पोका प्रफुल गोसावी ब नं २४४७ यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.