आज बुधवार दिनांक ०५ ऑक्टोबर २०२३ रोजी आय.एम.ए हॉल,अकोला येथे तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटी चे अध्यक्ष डॉ.सुगत वाघमारे यांच्या मातोश्री बु. गुंफाआई ग्यानेश्वर वाघमारे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मातृत्व करंडक-2023(वर्ष पहिले)भव्य राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मातृत्व करंडक वक्तृत्व स्पर्धा ही अकोला जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात जास्त नोंदणी आलेली सगळ्यात मोठी वक्तृत्व स्पर्धा ठरली. स्पर्धेचं वेळेच नियोजन पाहता १४३ पैकी ८३ विद्यार्थ्यांना
सहभागी करून घेता आले. यावेळी स्पर्धकांनी कार्यक्रमातील उत्कृष्ट नियोजनबद्धतेचे भरभरून कौतुक केले.
खुली वक्तृत्व स्पर्धेचा निकाल हा पुढील प्रमाणे आहे. मानाचा करंडक – प्रसाद देविदास जगताप , धुळे, प्रथम क्रमांक – सुमित जोशी , वाशिम, द्वितीय क्रमांक – स्मित सचिन भोयर , अकोला, तृतीय क्रमांक – सविता राठोड , वाशिम, उत्तेजनार्थ परितोषिके – प्रथम – जितेंद्र आसोले , गोंदिया, द्वितीय- रेवती बबन वाघमारे
तर तृतीय-श्रुती शिवदास पुंडे यांनी पटकाविले.
स्पर्धेला परीक्षक म्हणून श्रीकांत पिंजरकर, डॉ. स्वप्निल इंगोले, प्रा.आशिष कांबळे यांनी काम पाहिले.
यावेळी डॉ. सुगत वाघमारे, ॲड. संजय सेंगर,कल्पना तेलंग, मंदा खंडारे, तिक्ष्णगत वाघमारे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी चे अमित खांडेकर, युवाव्याख्याते प्रतिक महल्ले ,प्रतुल विरघट, रवी बोंबडकार, आनंद महल्ले , रोहन महल्ले , विशाल प्रधान, अक्षय शिरसाट, अंकुश शिरसाट रवि तायडे, अमोल तायडे, विशाल शिंदे, उमेश शिरसाट, श्वेता शिरसाट, पूजा वैद्य ,सुचिता घोगरे, सपना म्हात्रे, राहुल चौरपगार, सनी वाळके, स्वप्निल शिरसाट, लालदेव महतो, यांच्या समवेत जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.