
अकोला: स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मधील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात दिनांक 31 जानेवारी 2023 वार मंगळवारला सकाळी १० ते संध्याकाळी ७ पर्यंत मूकनायक महोत्सवाचे आयोजन मूकनायक महोत्सव समिती अकोला यांनी केले असून या महोत्सवामध्ये विविध मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन केले असून विद्रोही तुकाराम ऐकावा तर तो प्रा. वसंत पुरके माजी मंत्री, सरांच्या वाणीतूनच, पत्रकारितेचा थरार ऐकायचा ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांच्याकडूनच, मी सावित्री बोलते बघावा तो यशस्वी काशीकर यांच्या प्रयोगातूनच , शाहिरी जलसा उभा करावा तो आंबेडकर चळवळीतील जगप्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांनीच असा अनेक भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी या ठिकाणी आयोजित केली असून या मेजवानीचा लाभ घेण्यासाठी मूकनायक महोत्सवाला जागृत नागरिकांनी तसेच आंबेडकरी विचाराच्या लोकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्तरुणाई फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तथा लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाचे केंद्रीय सदस्य श्री संदीप देशमुख यांनी केले आहेव मूकनायक उत्सव समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रका द्वारे करण्यात आले आहे.