
स्थानिक: अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ अकोला येथील कुलगुरू यांच्या दालना समोरील १२ दीवसांपासुन चालू असलेल्या कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. सोबतच कायदेशीर मदतीला अकोला येथील विधीज्ञ प्रविण तायडे यांची विद्यार्थ्यांशी प्राथमिक बैठक घेऊन प्रश्न मार्गी लागण्यासाठी चर्चा झाली.

यावेळी युवा प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे, महीला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधतीताई शिरसाट,विद्यार्थ्यांचे प्रतिनीधीअमित आडोले, किशोर अरगडे,दुष्यंत रहांगडाले,ऋषिकेश कदम,वंचित चे सचिन शिराळे,जय तायडे, आशिष मांगुळकर,कुणाल राऊत,श्रीकांत घोगरे,आदीत्य इंगळे,प्रशिक मोरे, राजकुमार दामोदर, दादाराव पवार, आकाश गवई, नितीन सपकाळ,धिरज इंगळे, सुजित तेलगोटे, पप्पू मोरे, आकाश जंजाळ, राजु बोदडे,मंगेश सावंग,अक्षय डोंगरे, हरिष रामचवरे,यश घनबहाद्दुर,शुक्लोदन वानखडे आदी उपस्थित होते.